Sukanya Samriddhi Yojana : घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने सुकन्या समृद्धी योजनेमध्ये जमा झालेल्या पैसा करू शकता चेक, आत्ताच जाणून घ्या बॅलेन्स!
Sukanya Samriddhi Yojana : भारत सरकार लोकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आखत असते. या सुकन्या समृद्धी योजना माध्यमातून लोकांचे कल्याण आणि उत्कर्ष कशाप्रकारे होईल याचा विचार देखील करत असते परंतु अनेक शासकीय योजना सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचतच नाही कारण की अनेकांना या योजना माहिती नसतात. तुम्ही सर्वांनी समृद्धी सुकन्या समृद्धी योजना ऐकली असेल.
या संदर्भातील वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती देखील तुम्ही माध्यमांमध्ये पाहिल्या असतील. जर तुम्ही या योजनेमध्ये पैसा गुंतवलेला असेल किंवा दर महिन्याला विशिष्ट रक्कम भरलेली असेल तर तुम्हाला तुमच्या या योजनेच्या खात्यामध्ये जमा झालेला पैसा आता ऑनलाइन माध्यमातून चेक करता येणार आहे,यासाठी तुम्हाला बँकेमध्ये जायची गरज नाही. ऑनलाईन माध्यमातून एका क्लिकच्या आधारावरच तुम्ही संपूर्ण तपशील जाणून घेऊ शकता.
सुकन्या समृद्धी योजना ही विशेषतः मुलींच्या कल्याणासाठी व उत्कर्षासाठी नियोजित केली गेलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्ही दरवर्षी दीड लाख रुपये जमा करून मुलीच्या उज्वल भविष्यासाठी एक रक्कम जमा करू शकता.
ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये किती जमा झालेली आहे व तुम्हाला किती वर्ष भरायची आहे या संदर्भातील सर्व माहिती तुम्हाला सहज जाता उपलब्ध करून दिली जाईल. ही माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धत वापरावी लागेल.
मुलींचे कल्याण साधणारी योजना
मुलींचे शिक्षण आणि लग्नाची चिंता दूर व्हावी याकरिता केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजना सुरू केली होती. या योजनेच्या माध्यमातून मुलींची प्रगतीचे मार्ग खुले करण्यात आले आहे तसेच ही योजना सरकारने “बेटी बचाव बेटी पढाव” या योजनेअंतर्गत केलेली आहे.
या योजनेमध्ये तुम्ही दरवर्षी दीड लाख रुपये जमा करून तुम्ही तुमच्या मुलीसाठी दीर्घ कालावधीसाठी एक रक्कम जमा करू शकता, यामुळे मुलीच्या शिक्षणासाठी व तिच्या लग्नासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची चिंता करावी लागणार नाही.
सुकन्या समृद्धी योजना मध्ये तुम्हाला व्याज देखील मिळणार आहे तसेच तुम्हाला चक्रवाढ व्याजाचाही लाभ घेता येणार आहे. ज्या मुलींचे वय दहा वर्षापेक्षा कमी आहे, अशा कोणत्याही मुलीच्या नावावर पालक किंवा कायदेशीर पालक हे खाते उघडू शकतात.
सुकन्या समृद्धी योजना 21 वर्षात परिपक्व होते परंतु तुम्हाला पंधरा वर्षासाठी गुंतवणूक करणे गरजेचे आहे. सध्या या योजनेवर तुम्हाला 8 टक्के दराने व्याज दिले जात आहे.
या कालावधीनंतर तुम्हाला योजनेतून काढता येतील पैसे
या योजनेमध्ये वर्षाला कमीत कमी 250 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये जमा करता येतील मुलीच्या वयाच्या अठरा वर्षानंतर एकूण पैशांपैकी 50% पैसे तुम्हाला काढता येऊ शकतात.
या पैशाचा उपयोग पदवी किंवा पुढील अभ्यासासाठी देखील तुम्हाला करता येईल त्यानंतर मुलगी 21 वर्षाची झाल्यावर सर्व पैसे तुम्हाला काढता येतील. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला संपूर्ण 21 वर्ष पैसे जमा करावे लागणार नाही.
खाते उघडल्यापासून पंधरा वर्षासाठीच हे पैसे जमा करावे लागणार आहेत. ही योजना एकंदरीत करमुक्त आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला कोणत्याही प्रकारचा कर भरावा लागणार नाही.
या योजनेअंतर्गत वेगवेगळ्या स्तरावर देखील कर सूट देण्यात आलेली आहे तसेच कलम 80 सी अंतर्गत दीड लाख रुपयांवर सूट. दुसरे म्हणजे या योजनेतून मिळणाऱ्या पैशांच्या रिटर्न वर कोणत्याही प्रकारचा कर आकारला जाणार नाही. तिसरी सूट म्हणजे मॅच्युरिटी वर कोणत्याही प्रकारचा कर लागत नाही.
अशाप्रकारे चेक करा Sukanya Samriddhi Yojana ऑनलाईन बॅलन्स
जर तुम्हाला सुकन्या समृद्धी योजने च्या ऑनलाईन पद्धतीचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला बँकेची नेट बँकिंग सुविधा वापरावी लागणार आहे, त्यानंतर युजरनेम आणि पासवर्ड च्या मदतीने तुम्हाला लॉगिन करायचे आहे.
लॉगिन केल्यानंतर डॅशबोर्ड मध्ये तुम्हाला तुमच्या सर्व खात्यांची एक सूची दिसेल. डाव्या बाजूला अकाउंट स्टेटमेंट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर सुकन्या खाते क्रमांक वर तुम्हाला क्लिक करायचे आहे तेव्हा स्क्रीनवर सध्या जमा असलेला पैसा म्हणजेच बॅलन्स तुम्हाला स्क्रीनवर दिसेल.
आता भविष्यात देखील तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेऊन तुम्हाला आवश्यक असलेल्या माहितीचा उपयोग करू शकता तसेच तुमच्या खात्यामध्ये जमा असलेला बॅलन्स एका क्लिकवर जाणून घेऊ शकता.