Start Business With No Money : एकही रूपया न लावता स्वताचा व्यवसाय सुरू कसा करायचा
Start Business With No Money : आज आपण एका अशा व्यवसायाविषयी माहीती जाणुन घेणार आहोत ज्या मध्ये कुठल्याही मशिनची आवश्यकता भासत नाही अणि मार्केटिंग देखील करावी लागत नाही.
तरी देखील आपण ह्या व्यवसायादवारे ३० हजार रुपये कमाई करू शकतो.अणि महत्वाची बाब म्हणजे एसबी आय बॅक देखील हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला आर्थिक मदत करेल.ह्या व्यवसायाचे नाव आहे डीसीएम स्टोअर.(DIY craft material store)यालाच आपण हस्तकला साहित्य स्टोअर असे देखील म्हणतो.
हा व्यवसाय सुरू करणे अत्यंत सोपे आहे.यात आपणास मशिन बसवून कुठलेही उत्पादन स्वता तयार करण्याची गरज नसते तसेच आपल्या उत्पादनाची मार्केटिंग देखील करत बसावी लागत नाही.
Five Business Idea : गावात राहून या पाच व्यवसायामधून कमवू शकता लाखो रुपये;पहा सविस्तर माहिती
डिसीएम स्टोअर मध्ये अशा उत्पादनांची विक्री केली जाते.ज्याचे निम्मे कस्टमर पर्मनंट स्वरूपाचे आहेत.अणि उर्वरीत कस्टमर तात्पुरता स्वरुपाचे आहेत.आज अनेक महिला अशा आहेत ज्यांच्या हातात वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य आहे.प्रत्येक महिलेची लहानपणापासून स्वताच्या हाताने असे काही बनवण्याची इच्छा असते.जे तिच्या माहेरच्या आठवणीत राहुन जाईल.
जे तिच्या घरात उपयोगी पडेल घराची शोभा वाढवेल.आज महिला वर्ग खाण्या पिण्याच्या पदार्थांपासून सर्व प्रकारच्या वस्तू बनवू शकतात.पण आपल्या हाताने कुठलीही वस्तू तयार करण्यासाठी त्यांना पुरेसे साहित्य उपलब्ध होत नाही अणि जे काही साहित्य उपलब्ध होत असते त्यात देखील तडजोड करावी लागते.अणि आहे त्यात समाधान मानावे लागते.
Business With No Money
सगळ्यात पहिले असे एखादे शहर बघायचे किंवा आपल्या राहत्या शहरात जिथे शाळा काॅलेज आहेत अणि भरपुर असे लोक देखील आहेत ज्यांना सर्जन शीलतेची आवड आहे.अशा ठिकाणी स्वताचे क्राफ्ट मटेरियल स्टोअर सुरू करायचे.
मार्केट मध्ये सध्या कोणकोणत्या प्रकारचे क्राफ्ट मटेरियल उपलब्ध आहे याचा तपास करायचा.यासाठी आपण आॅनलाईन अणि आॅफलाईन पद्धतीने देखील करू शकतो.
यानंतर आपल्या क्राफ्ट मटेरियल बनविण्याकरीता मॅनयुफॅक्चर शोधायचा.यानंतर आपल्या क्राफ्ट मटेरियलची विक्री करण्यासाठी सर्वोत्तम दर शोधायचे.
आपल्या शहरातील क्राफ्ट मटेरियल व्यवसायाशी निगडित काही इतर लोकांशी चर्चा करावी त्यांचा सल्ला घ्यावा सध्या मार्केटमध्ये कस्टमर कडुन कोणत्या प्रकारच्या डीआय व्हाय क्राफ्ट मटेरियलची डिमांड केली जात आहे हे जाणुन घ्यावे.हे सर्व झाल्यावर आपल्या व्यवसायाची कायदेशीर पदधतीने नोंदणी करून घ्यायची आहे.
यानंतर विक्रीसाठी वस्तु खरेदी करायच्या दुकानात त्यांची सजावट करायची अणि आपल्या वेगवेगळ्या सोशल मिडिया अकाऊंट वरून आपल्या व्यवसायाची मार्केटिंग करावी.लोकांपर्यत आपला व्यवसाय पोहचवायचा.