Post Office Scheme

Post Office Scheme : भारतीय पोस्ट ऑफिस घेऊन आले आहे आकर्षक RD योजना दर महिन्याला भरा इतके रुपये आणि मिळवा आकर्षक व्याजदर!

Post Office Scheme : मित्रांनो हल्ली प्रत्येक जण भविष्या संदर्भात वेगवेगळे योजना आखत असतो. भविष्यामध्ये इन्शुरन्स, एफडी, म्युच्युअल फंड, एसआयपी, बँक बॅलन्स यांचा अनेक जण विचार करत असतात तसेच बहुतेक जण फ्युचर प्लॅनिंग देखील करत असतात.

जर तुम्ही देखील पैसा कुठेतरी गुंतवणूक करणार असाल आणि भविष्यात तुम्हाला भरघोस आकर्षक व्याजदर हवा असेल तर तुमच्यासाठी आज आम्ही एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत.

या माहितीच्या मदतीने तुम्हाला भविष्यात तुमचा पैसा वाढलेला दिसेल तसेच आकर्षक व्याजदरामुळे काही वर्षांमध्ये तुमच्या पैशाचे मूल्य देखील वाढणार आहे, चला तर मग जाणून घेऊया अशा एका योजनेसंदर्भात ही योजना तुम्हाला भविष्यात लखपती बनायला मदत करणार आहे.

तुम्हा सर्वांना भारतीय पोस्ट माहितीच असेल. या पोस्टच्या माध्यमातून फक्त पत्र व्यवहार केला जातो इतकेच नाही तर वेगवेगळ्या प्रकारच्या इन्शुरन्स सेवा देखील पुरवल्या जातात. एफ डी, आर डी यासारख्या अनेक योजना भारतीय पोस्ट कार्यालय भारतीय नागरिकांना पुरवत असते परंतु अनेकांना या योजनांबद्दल फारशी माहिती नसते.

म्हणूनच या योजनेचा सर्वसामान्य नागरिकांना लाभ घेता येत नाही. आज आम्ही तुम्हाला इंडियन पोस्ट आरडी स्कीम बद्दल माहिती सांगणार आहोत. या योजनेच्या माध्यमातून तुम्ही दर महिन्याला फक्त 2500 रुपये गुंतवणूक करून पाच वर्षांमध्ये आकर्षक परतावा प्राप्त करू शकता.

जर तुम्हाला पैशांची बचत करायची असेल तर आरडी हा तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा पर्याय आहे. या मार्गाने तुम्ही महिन्याला फक्त 2500 रुपये भरून थोडे थोडे पैसे वाचवून भविष्याची तरतूद करू शकतात.

परंतु आपण वाचवलेले पैसे बुडणार तर नाही याची भीती देखील अनेकांना असते म्हणूनच अन्य बँकांमध्ये पैसे गुंतवणूक करण्यापेक्षा भारतीय पोस्ट मध्ये पैसे गुंतवणूक केले तर हे नेहमी सुरक्षित राहते तसेच तुम्हाला येथे अन्य बँकांपेक्षा जास्त व्याजदर देखील मिळतो.

जर तुम्ही भविष्यात आरडी खाते पोस्ट ऑफिस मधून उघडले तर तुम्हाला खूप सारे पैसे प्राप्त होऊ शकतात तसेच पोस्ट ऑफिस हे असे एकमेव ठिकाण आहे, जेथे तुमच्या पैशांच्या सुरक्षिततेची हमी दिली जाते. अन्य ठिकाणी तुमचे पैसे बुडण्याची शक्यता जास्त असते परंतु पोस्ट ऑफिस मध्ये अशी शक्यता खूपच कमी असते.

Interest Rate Post Office Scheme

जर तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये आरडी बनवणार असाल तर तुम्हाला या आरडीवर 6.50 इतके इंटरेस्ट रेस्ट मिळेल. हा व्याजदर खूपच जास्त आहे. पोस्ट ऑफिस मध्ये आरडी उघडून 5 वर्षासाठी पैशांची गुंतवणूक तुम्हाला भविष्यात चांगला नफा मिळवून देऊ शकते.

पाच वर्षाचा लॉकिंग पिरेड झाल्यानंतर तुम्ही कालावधी देखील वाढवू शकता असे केल्याने तुम्हाला अजून व्याजदर मिळू शकतो तुमच्या पैशांची किंमत लाखांच्या घरात देखील पोहोचू शकते.

पोस्ट ऑफिस मध्ये तुम्ही 2500 रुपयांपासून आरडी ची सुरुवात करू शकतात जर तुम्ही दर महिना 2500 रुपये 5 वर्षांकरिता गुंतवले तर तुम्हाला पाच वर्षाच्या शेवटी 1.77 लाख रुपये निधी मिळू शकतो.

यामध्ये तुमची ठेव किंमत 1.5 लाख रुपये आणि वरील किंमत ही व्याजाची किंमत आहे. म्हणजेच अडीच हजार रुपये गुंतवणूक वर्षाला पाच वर्षात तुम्हाला 27 हजार 481 रुपये इतकी रक्कम म्हणून मिळते.

5 वर्षानंतर तुम्ही आरडी वाढवली आणि पुढील पाच वर्षात तुम्हाला अडीच हजार रुपये दर महिन्यानुसारच दहा वर्षांमध्ये 4.22 लाख रुपये मिळतील आणि तुम्हाला 1.22 लाख रुपये व्याज मिळतील.

जर तुम्हाला तुमच्या आरडीवर अजून आकर्षक व्याजदर आणि पैसा मिळवायचा असेल तर पंधरा वर्षासाठी तुम्ही आरडी वाढवू शकता असे केल्याने तुम्हाला 7.60 लाख रुपये निधी मिळेल अन् यात 3.10 रुपये इतके आकर्षक व्याजदर मिळेल.

अशाप्रकारे 15 वर्षांमध्ये तुमच्या पैशांची किंमत दुप्पट तिप्पट होते आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही चांगली रक्कम देखील जमा करू शकता आणि म्हणूनच कमी किमतीमध्ये देखील तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये दर महिन्याला काही पैसे जमा करून आरडी काढू शकता.

अधिक माहितीसाठी जवळच्या पोस्ट ऑफिस केंद्रावर जाऊन तुम्ही माहिती मिळवू शकता व याच महिन्यापासूनच आरडी खाते उघडून अशा उत्तम योजनेचा लाभ घेऊ शकता.

Similar Posts

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *