T-Shirt Printing Business

Business Idea : कमी पैसे गुंतवणूक करून सुरु करा हा व्यवसाय पैशाची कमी भासणार नाही

Business Idea in Minimum Investment : आपल्यापैकी अनेकांना नवीन काहीतरी करायचं असते. मनामध्ये खूप सार्‍या कल्पना असतात. डोक्यांमध्ये खूप सारे विचार असतात. हे विचार सत्यामध्ये आणण्यासाठी अनेक धडपड देखील आपली चालू असते, अशावेळी आपण नव्याने काय करता येईल याचा सातत्याने पाठलाग तो विचार करत असतो.

अनेकांना नोकरी करून देखील कंटाळा आलेला असतो. नोकरीतून समाधान मिळत नाही. नोकरीमध्ये मिळणारा पगार महिनाभर पूरक देखील नाही, अशावेळी एखादा व्यवसाय करावा व आपल्या आर्थिक परिस्थिती सुधारावी असे प्रत्येकाला वाटत असते .

तुमच्या मनात देखील असा विचार येत असेल तर अतिशय उत्तम आजच्या या लेखांमध्ये Business Idea आणि तुम्हाला अशीच एक नवीन माहिती सांगणार आहोत. ज्या माहितीमुळे तुम्हाला कमी भांडवलामध्ये व कमी गुंतवणूक मध्ये काही व्यवसाय करता येणार आहेत. या व्यवसायाच्या मदतीने तुमची आर्थिक परिस्थिती देखील सुधारणार आहे.

या आर्थिक व्यवसायातून तुम्ही महिन्याला लाखो रुपये कमवू शकतात तसेच हा व्यवसाय कधीच बंद पडणार नाही म्हणूनच तुम्हाला आर्थिक स्थैर्य देखील लाभेल.

आपल्या सर्वांचे घरी गॅस सिलेंडर येत असतो सिलेंडर संपला की गॅस वाल्याची आठवण आपल्याला येते. अनेक ठिकाणी गॅसच्या पाईपलाईन देखील लावल्या गेल्या आहेत परंतु सिलेंडर व गॅस याचा संबंध सर्वसामान्य लोकांशी जवळचा येत असतो परंतु या संदर्भातील एक व्यवसाय तुम्ही देखील करू शकता तो म्हणजे गॅस एजन्सीचा व्यवसाय.

केंद्र सरकार देते Business Idea साठी कर्ज

गॅस एजन्सीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला काही नियम व अटी यांची पूर्तता करणे गरजेचे असते तसेच हा व्यवसाय सुरू करण्यासाठी जर जास्त प्रमाणात पैसे नसतील तरी चिंता करू नका.

केंद्र सरकार तुम्हाला हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज देखील देते. या मिळालेल्या कर्जाच्या माध्यमातून तुम्ही गॅस एजन्सीचा व्यवसाय सुरू करू शकता.

गॅस एजन्सी सुरू करण्यासाठी चार प्रकारचे वितरक प्रामुख्याने असतात.

गॅस एजन्सी सुरू करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एलपीजी गॅस एजन्सी साठी डिस्ट्रीब्यूटर शिप घेणे गरजेचे आहे. यामध्ये शहरी, ग्रामीण, ग्रामीण आणि हार्ट रीच क्षेत्रीय वितरण असे चार प्रकारचे वितरक आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतात.

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला अर्ज द्यावा लागतो परंतु अर्ज करण्याआधी आपल्याला एजन्सी कुठे स्थापन करायची आहे? एजन्सी चे क्षेत्र कुठे असणार आहे? याकरिता आजूबाजूच्या गोष्टींचे नीट परीक्षण करावे लागणार आहे. परीक्षण व सर्वेक्षण केल्यानंतरच तुम्हाला एजन्सीचा परवाना मिळू शकतो.

अटी

तुम्हाला गॅस एजन्सी सुरू करायची असेल तर तुमचे वय 21 ते 60 वर्ष असायला हवे त्याचबरोबर अर्जदाराचे शिक्षण कमीत कमी दहावी उत्तीर्ण असायला हवे. कुटुंबातील सदस्य कोणत्याही तेल विपण कंपनीचा कर्मचारी असला नाही पाहिजे.

अर्ज करण्यासाठी तुम्हाला दहा हजार रुपये इतका शुल्क भरावा लागणार एवढेच नाही तर तुमच्याकडे 15 लाख रुपये गोदाम आणि एजन्सी कार्यालय बांधण्यासाठी असायला हवे.

डिस्ट्रीब्यूटरशिप प्रक्रिया

तुम्हाला भारत गॅस इंडियन गॅस आणि एचपी गॅस कडून डिस्ट्रीब्यूटर पदासाठी अर्ज करायचा असल्यास तुम्हाला या तिन्ही सरकारी कंपन्या तुम्हाला डिस्ट्रीब्यूशन वितरण करतात त्याकरिता तुम्हाला वर्तमानपत्र आणि माध्यमातून जाहिराती पाहाव्या लागतील. या कंपन्या अधिसूचना देखील जारी करतात, अशावेळी तुम्ही अर्ज करू शकता आणि डिस्ट्रीब्यूटर शिप मिळवू शकता

असा मिळवा परवाना

गॅस एजन्सी सुरू करताना तुमच्याकडे परवाना देखील असायला हवा विनापरवाना तुम्ही एजन्सी उघडू शकत नाही, अशावेळी गॅस एजन्सी चे लायसन्स म्हणजेच परवाना मिळवण्याकरिता तुम्हाला lpgvitarakchayan या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. यानंतर स्वतःची प्रोफाइल उघडावी लागणार आहे.

यानंतर कंपन्या अर्जदारांची मुलाखत घेते मुलाखतीमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही दिलेली सर्व माहिती तपासून चौकशी केल्यानंतर तुम्हाला एक पत्र देण्यात येते.

परवाना मिळवताना एक गोष्ट तुम्हाला लक्षात घेणे गरजेचे आहे जसे की तुम्हाला ज्या कंपनीकडून डिस्ट्रीब्यूटर शिफ्ट घ्यायची आहे त्या कंपनीमध्ये तुम्हाला काही सेक्युरिटी रक्कम जमा करावी लागते त्यानंतरच तुमच्या नावावर गॅस एजन्सी देण्यात येते.

अशा काही प्रक्रियेच्या माध्यमातून तुम्ही स्वतःची गॅस एजन्सी सुरू करू शकता. एकदा का गॅस एजन्सी सुरू केल्यास तुम्हाला भविष्यात कधीच मागे वळून पाहावे लागणार नाही. तुमच्याकडे पैसा कधीच कमी राहणार नाही.

पैशाची कमतरता पूर्णपणे दूर होऊन आर्थिक संपन्नता तुमच्या जीवनामध्ये येणार आहे त्याचबरोबर हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कमी भांडवल लागत असले तरी जोखीम मात्र जास्त आहे अशावेळी सर्व गोष्टींचा विचार करून तुम्ही गॅस एजन्सी हमखास सुरु करू शकता.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *