RBI New Guidelines For Loan : लोन अकाऊंटवर आकारल्या जाणारया दंडाबाबत आरबीआयने जारी केल्या नवीन मार्गदर्शक सूचना
RBI New Guidelines For Loan : लोन अकाऊंटवर आकारल्या जाणारया दंडाबाबत आरबीआयने जारी केल्या नवीन मार्गदर्शक सूचनाआरबीआयने सर्व बॅक तसेच वित्तीय संस्थांना कर्ज खात्यामधल्या दंडाची वसुली करण्यासाठी काही नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत.
आरबीआयच्या ह्या नवीन मार्गदर्शक तत्वांमध्ये कर्ज खात्यामधल्या दंडाविषयी देखील काही महत्वाचे नियम जारी करण्यात आले आहे.रिझर्व बँकेने कर्ज खात्यामधल्या दंडाची वसुली करण्यासाठी जाहीर केलेल्या आपल्या नवीन नियमात असे स्पष्टपणे सांगितले आहे.
की सर्व बॅका तसेच नियमन केलेल्या सर्व वित्तीय संस्था यांनी आपल्या महसुलात वाढ व्हावी म्हणून कर्ज खात्यावर कुठल्याही प्रकारचा दंड आकारू नये तसेच असा पर्याय वापरण्याचा प्रयत्न देखील करू नये.
RBI आरबीआयच्या वतीने सर्व बॅका तसेच वित्तीय संस्था यांना सुचना देण्यासाठी एक परिपत्रक काढण्यात आले आहे ज्यात सांगितले आहे की बॅका तसेच वित्तीय संस्था यांनी कर्ज खात्यावरील दंडाच्या नियमांचे पालन कशा पद्धतीने करायला हवे.याबाबदच्या आवश्यक सुचना देखील आरबीआयने दिल्या आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की सध्या अनेक बॅका तसेच वित्तीय संस्था कर्ज देताना आकारणी केल्या जात असलेल्या व्याजाच्या रक्कमेत दंड घुसवताना दिसुन येत आहे.
म्हणजे अनेक वित्तीय संस्था तसेच बॅका कर्जावर आकारणी केल्या जात असलेल्या व्याजावर दंड आकारू पाहत आहे ज्याच्या आधारे बॅका तसेच वित्तीय संस्था कर्जदाराकडुन कर्जाच्या बदल्यात व्याजावर व्याज आकारत आहे.ह्या सर्व घटनांना लक्षात घेता आरबीआयने काही नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत.
नवीन मार्गदर्शक तत्वांमध्ये असे देण्यात आले आहे की जर बॅकेकडुन तसेच कुठल्याही वित्तीय संस्था कडुन कर्ज घेतलेल्या एखाद्या व्यक्तीने कर्जाचा हप्ता चुकवेल तेव्हा बॅक तसेच वित्तीय संस्थेकडून आकारली जाणारी पेनल्टी ही दंडात्मक व्याज नव्हे तर दंडात्मक शुल्क म्हणून आकारण्यात येणार आहे.याबाबत आरबीआयने आपल्या ह्या नवीन नियमांबाबद त्यांच्या आॅफिशिअल टविटर अकाऊंट वर देखील माहीती दिली आहे.
आपल्या टविट मध्ये आरबीआयने जाहीर केलेले आपले नवीन सरक्युलर देखील टाकले आहे.हया सरक्युलर मध्ये कोणकोणत्या नियमांत काय बदल करण्यात आला आहे हे सविस्तरपणे सांगितले गेले आहे.
आरबीआयच्या ह्या जारी केलेल्या सर्व मार्गदर्शक सूचना २०२४ मध्ये १ जानेवारी पासुन लागु केल्या जाणार आहेत.असे देखील ह्या परिपत्रकात नमूद केले गेले आहे.आरबीआयने आपल्या परिपत्रकात सांगितले आहे की कर्जावर आकारल्या जाणारया दंडाबाबत एक बोर्ड मान्यता धोरण असायला हवे ज्यात पारदर्शकता असायला हवी.
आरबीआयच्या अशा निदर्शनास आले होते की कर्ज घेतलेल्या व्यक्तींना जो काही पेनल्टी चार्ज भरावा लागत होता तो व्याजापेक्षा अधिक असायचा.
त्यामुळे आरबीआयने आपले ह्या नवीन गाईडलाईनस जाहीर केल्या आहेत.हया नवीन मार्गदर्शक नियमांमध्ये ह्या गोष्टीची विशेष काळजी घेतली जाणार आहे की कर्ज घेतलेल्या व्यक्तींकडुन बॅक जो काही पेनल्टी चार्ज वसुल करते तो वाजवी असायला हवा.
पण महत्वाची बाब ही आहे की आरबीआयने किती पेनल्टी चार्ज आकारण्यात यायला हवा याबाबत कुठलेही स्पष्टीकरण अद्याप दिलेले नाहीये.पण जो काही पेनल्टी चार्ज बॅकेकडुन आकारला जाईल तो वाजवी असेल एवढेच आरबीआयने आपल्या ह्या नवीन मार्गदर्शक सूचनांमध्ये सांगितले आहे.तसेच कुठल्याही कर्जावरील दंड हा व्याजापेक्षा अधिक नसावा.
कोणकोणत्या बॅकांना आरबीआयचा हा नवीन नियम लागु केला जाईल?
हा नवीन नियम तसेच नवीन मार्गदर्शक सूचना सर्व प्रादेशिक ग्रामीण बॅका,पेमेंट बॅक,सर्व स्थानिक क्षेत्र बॅक अणि स्माॅल फायनान्स बॅक यांना देखील लागु करण्यात येणार आहे.
याचसोबत सर्व प्राथमिक नागरी सहकारी बँक,एनबी एफबी,हाऊसिंग फायनान्स कंपन्या,एक्झिम बॅका,आखिल भारतीय वित्तीय संस्था,एन एचडी,सीडबी, नाबार्ड इत्यादी बॅकांना देखील आरबीआयच्या ह्या नवीन मार्गदर्शक सूचना नियम लागु होतील.
आरबीआयच्या ह्या नवीन नियमामुळे फायदे
कर्जदारांच्या दंडाच्या रकमेबाबद ज्या काही तक्रारी असायच्या त्या सर्व तक्रारी आरबीआयच्या ह्या नवीन मार्गदर्शक सूचना नियमांमुळे बंद होतील.आरबीआयच्या ह्या सर्व नियमांचे पालन बॅकांना 01 जानेवारी 2024 पासुन करणे बंधनकारक असणार आहे.आरबीआयची ही सर्व मार्गदर्शक तत्वे नियम नियमन केलेल्या संस्थेला लागु होतील पण क्रेडिट कार्ड मध्ये हे लागु होणार नाही.