Jio Petrol Pump

Jio Petrol Pump : जिओ चे पेट्रोल पंप खोलून चांगली कमाई करा; काय असेल प्रक्रिया कसे मिळवलं पेट्रोल पंप

Jio Petrol Pump : असे म्हणतात ज्या व्यक्तीला काही करण्याची इच्छा असते, तो कसे ना कसे..कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आपले ध्येय पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो, फक्त अंगी मेहनत करण्याची जिद्द असायला हवी. आजचा तरुण वर्ग नवनवीन उद्योगांमध्ये आवर्जून स्वतःचे नशीब आजमावण्यास प्रयत्न करत आहे.

जर तुम्ही देखील नोकरी करून कंटाळलेला असाल, पगाराची नोकरी तुम्हाला नको हवी असेल तर एक चांगला व्यवसाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या व्यवसायाच्या मदतीने तुम्ही महिन्याला लाखो करोड रुपये आरामात कमवू शकता, चला तर मग जाणून घेऊया हा नेमका व्यवसाय कोणता आहे त्याबद्दल…

रिलायन्स कंपनी आपल्या सर्वांना माहिती आहे. रिलायन्स कंपनी तरुण उद्योजकांसाठी नवीन नवीन पर्याय उपलब्ध करत असते. आता रिलायन्स कंपनीने Jio Petrol Pump हा नव्याने व्यवसाय सुरू केलेला आहे.

या व्यवसायाची डीलरशिप देखील ही कंपनी आता देत आहे. जर तुम्हाला देखील जिओ बीपी पेट्रोल पंप ची डीलरशिप घ्यायची आहे किंवा डीलरशिप साठी अर्ज करायचा आहे तर या सर्वांचा संबंधित असणारी महत्त्वाची माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत ज्यांना वाहन चालवणे आवडत असते. वाहन म्हटले की त्यांचा जीव की प्राण आहे, अशा वेळी वाहनांसोबत पेट्रोलचा देखील मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

पेट्रोल शिवाय गाड्या रस्त्यावर धावू देखील शकत नाही. पेट्रोलच्या माध्यमातून तुम्ही खूप सारे पैसे देखील भविष्यात कमवू शकता.

जर तुम्हाला भविष्यात पेट्रोल पंप उघडण्याची इच्छा असेल तर तुम्ही पेट्रोल पंप उभारण्याचा व्यवसाय करू शकता. देशात अनेक अशा काही कंपन्या आहेत, ज्या पेट्रोल पंपची डीलरशिप देतात यामध्ये इंडियन ऑइल भारत पेट्रोलियम हिंदुस्तान पेट्रोलियम इत्यादी चा समावेश मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळतो.

जर तुम्हाला देखील पेट्रोल पंप सुरू करायचा असेल तर त्याची डीलरशिप घेणे अनिवार्य आहे. रिलायन्सने देखील तरुणांसाठी डीलरशिप उपलब्ध करून दिलेली आहे परंतु त्या संदर्भात अर्ज कुठे करायचा आहे हे अनेकांना माहिती नसते. चला तर मग हा अर्ज कसा भरायचा आहे हे जाणून घेऊया..

असा करा अर्ज

जिओ बीपी यांनी आपल्या वेबसाईटवर त्यांचे नेटवर्क वाढवण्यासाठी आणि देशभरात वेगवेगळ्या शाखा निर्माण करण्यासाठी व कंपनी पुढे नेतील असे अनेक उद्योजक शोधण्याच्या प्रयत्नात आहे, अशा उद्योजकांना जिओ बीपी पेट्रोल पंपाची डीलरशिप देखील देत आहे.

जर तुम्हाला देखील पेट्रोल पंप उभारायचा असेल तर त्याकरिता तुम्हाला जिओ बीपीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन जी लिंक उपलब्ध आहे त्या लिंक वर क्लिक करून तुमची माहिती भरायची आहे. तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी ऍड करून तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे आणि त्यानंतर तुमची पुढील प्रक्रिया सुरू होईल.

जर तुम्हाला भविष्यात पेट्रोल पंप घ्यायचा असेल तर तुम्हाला काही गोष्टींची पूर्तता करावी लागेल. त्यासाठी जिओ पेट्रोल पंप उघडण्यासाठी तुमच्याकडे रस्त्याच्या बाजूला 1500 स्क्वेअर मीटर जमीन आणि हायवेवर 3000 स्क्वेअर मीटर जमीन असणे गरजेचे आहे, त्याचबरोबर दोन कोटी रुपयांची गुंतवणूक लागू शकते.

गुंतवणुकीमध्ये जमिनीची साधारण किमतीचा समावेश नसतो तसेच तुम्ही जर जमीन भाडेतत्त्वावर घेणार असेल तर तसा त्याचा करार देखील असायला हवा.

बोगस एजेंट पासून व्हा सावधान

जिओ बीपी ने त्यांच्या वेबसाईटवर काही नियमावली देखील दिलेल्या आहेत. या नियमावलीनुसार पेट्रोल पंप उघडण्यासाठी तुम्हाला कोणत्याही एजंटची आवश्यकता नाही तसेच जिओनी अधिकृतरित्या कोणत्याही एजंटची नियुक्ती केलेली नाहीये .एखादा एजंट तुमचे फसवणूक करत असाल तर तुम्ही पद्धतशीर तक्रार देखील करू शकता.

ह्या गोष्टी लागतील पेट्रोल पंप साठी

जर तुम्हाला हा पेट्रोल पंप उघडायचा असेल तर त्या करिता दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक करणार गरजेचे आहे त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये बारा ते पंधरा लाख रुपये व शहरी भागांमध्ये वीस ते पंचवीस लाख रुपये गुंतवणूक करणे गरजेचे आहे अशा काही गोष्टींची पूर्तता तुम्ही केल्यास तुम्हाला कंट्रोल पण उघडण्यासाठी परवानगी मिळू शकते.

इतकी होते कमाई

तुम्ही जर भविष्यात पेट्रोल पंपची डीलर शिप घेतली तर तुमची कमाई ही लाखोंच्या घरात जाऊ शकते. तुमची सर्वसाधारणपणे कमाई ही पेट्रोल पंप वरच एकंदरीत विक्रीवर होऊ शकते. प्रत्येक लेटर पेट्रोलच्या मागे दोन ते पाच रुपये सर्वसाधारणपणे कमिशन मिळते.

म्हणजेच तुम्ही पेट्रोल पंपावर जितके पेट्रोल पंपाची विक्री कराल तितकी तुमची उत्पादन क्षमता देखील जास्त होते आणि म्हणूनच अशा परिस्थितीमध्ये जर तुमचे पेट्रोल विक्री जास्त प्रमाणामध्ये गेल्यास तर तुम्हाला महिन्याभरामध्ये देखील लाखो करोड रुपयाची कमाई देखील करता येऊ शकते, म्हणूनच जर भविष्यात तुम्हाला देखील हा व्यवसाय निवडायचा असेल तर तुमच्यासाठी एक चांगला पर्याय देखील उपलब्ध आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *