क्रेडिट कार्ड वापरत असाल तर त्याचे पेमेंट कधी करावे जाणून घ्या सविस्तर माहिती | Credit Card Bill
Credit Card Bill : आज आम्ही तुम्हाला क्रेडिट कार्ड संदर्भातील एक अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहोत तसेच क्रेडिट कार्ड वापरल्यानंतर किती दिवसांमध्ये त्याचे बिल येते आणि किती दिवसांमध्ये आपल्याला बिल भरावे लागते याबद्दल अनेकांना फारशी माहिती नसते.
आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात, जे क्रेडिट कार्ड संबंधित अनेक प्रश्न विचारत असतात परंतु जर तुम्हाला देखील याचे उत्तर माहिती नसेल तर समोरच्या व्यक्तीचा गोंधळ निर्माण होऊ शकतो म्हणूनच आजची माहिती तुमच्यासारख्या अनेक तरुणांकरिता लाभदायक ठरू शकते.
तुम्हा सर्वांना माहिती आहे की क्रेडिट कार्डच्या मदतीने आपल्याला वेगवेगळे फायदे देखील होत असतात. सध्याच्या काळामध्ये क्रेडिट कार्डचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
हल्ली क्रेडिट कार्ड वापरणे एक सर्वसाधारण समीकरणच बनलेले आहे परंतु फायदेशीर आहेत . क्रेडिट कार्ड अगदी जबाबदारीने देखील वापरायला हवे. क्रेडिट कार्ड वापरल्यानंतर कार्डचे बील वेळेवर भरणे गरजेचे आहे, अन्यथा तुम्हाला अतिरिक्त पैसे भरावे लागू शकतात. या सर्व गोष्टींमुळे तुमच्या सिबिल स्कोर देखील चांगला राहतो.
वापर कर्त्या त्यांच्याकडे क्रेडिट कार्डच्या माध्यमातून केले गेलेले सर्व ट्रांजेक्शन ची एक हिस्टरी किंवा स्टेटमेंट क्रेडिट कार्ड बिल स्वरूपामध्ये प्राप्त होत असते एक क्रेडिट कार्ड सिस्टम महिन्याचे असते म्हणजेच प्रत्येक महिन्याला वापर करताना हे बिल पाठवले जाते.
महिन्याच्या शेवटी हे स्टेटमेंट जनरेट केले जाते आणि म्हणूनच क्रेडिट कार्ड वापरणार्या व्यक्तीला महिन्याभरातून किती ट्रांजेक्शन केले गेलेले आहे याची माहिती देखील मिळते.
आपल्यापैकी अनेकांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की क्रेडिट कार्ड वापरल्यानंतर क्रेडिट कार्ड स्टेटमेंट बिल किती दिवसांमध्ये येते तर या प्रश्नाचे उत्तर देखील जाणून घेणे जितकेच गरजेचे आहे.
जर समजा तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड 12 एप्रिलला जनरेट केलेले असेल म्हणजेच ऍक्टिव्ह केलेले असेल तर तुम्हाला 12 मे पर्यंत तुम्ही क्रेडिट कार्डच्या माध्यमातून जे काही ट्रांजेक्शन केले असेल त्याची संपूर्ण माहिती लेखाजोखा 13 मे रोजी क्रेडिट कार्डच्या माध्यमातून एक बिल जनरेट केले जाते.
हे बिल तुम्हाला तेरा मे ला मिळते. या बिल मध्ये महिन्याभरामध्ये तुम्ही जे काही खर्च केलेला असेल त्याची माहिती दिली जाते अशा प्रकारे क्रेडिट कार्ड तुम्हाला एक महिन्याचा अवधी देतो.
महिन्याभरात तुम्ही केलेले सारे खर्च त्यांची एकूण बेरीज करून तुम्हाला 13 मे ला म्हणजेच 31 व्या दिवशी बिल चे स्टेटमेंट मिळते. ते स्टेटमेंट हे तुमचे क्रेडिट कार्डचे बिल असते जेव्हा तुम्हाला मिळते तेव्हा त्यामधील काही महत्त्वाची माहिती तुम्हाला जाणून घेणे गरजेचे आहे.
स्टेटमेंट कालावधी
जेव्हा ही तुम्हाला क्रेडिट कार्डचे बिल किंवा स्टेटमेंट प्राप्त होते तेव्हा त्या बिलवर त्याचे त्याचा कालावधी लिहिलेला असतो हे स्टेटमेंट प्रामुख्याने मासिक तत्वावर उपलब्ध होते.
बिलिंग सायकल
बिलिंग सायकल हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे. बिलिंग सायकल ला क्रेडिट कार्डचा दोन विशिष्ट तिथे मध्ये नियोजित केले जाते, उदाहरणार्थ समजा की तुमचे क्रेडिट कार्डचे बिल 13 मे रोजी आलेले असेल तर पुढील बिल 13 जून पर्यंत तुम्हाला येते. या दोन्ही तारखांच्या दरम्यान जो कालावधी असतो त्याला बिलिंग सायकल असे म्हणतात.
पेमेंट ड्यू डेट
पेमेंट म्हणजे क्रेडिट कार्ड मिळण्याची शेवटची तारीख असते. या तारखेपर्यंत तुम्हाला भरावे लागते नाहीतर तुम्हाला यानंतरच्या पेमेंट वर अतिरिक्त चार्ज लागण्याची तसेच लेट पेमेंट देखील द्यावी लागेल आणि म्हणूनच वेळेच्या आधी क्रेडिट कार्ड बिल भरणे कधीही चांगले असते.
मिनिमम ड्यू
जर तुम्ही एखाद्या कारणामुळे क्रेडिट कार्डशी संपूर्ण बिल चुकवू शकत नसाल तर अशावेळी जितकं शक्य होईल तितकी रक्कम तुम्हाला भरणे गरजेचे आहे त्यानंतरची रक्कम तुम्ही उर्वरित कालावधीमध्ये देखील भरू शकता, अशा प्रकारच्या पद्धतीला मिनिमम ड्यू असे म्हणतात. या पद्धतीचा वापर केल्याने तुमचे क्रेडिट कार्ड बंद होत नाही कार्ड वापरण्याची क्षमता चालूच राहते.
आऊटस्टँडिंग बॅलन्स
आऊटस्टँडिंग बॅलन्स म्हणजे तुमच्या क्रेडिट कार्डची जी उरलेली रक्कम असते तिची रक्कम तुम्हाला विशिष्ट कालावधीमध्ये भरावी लागते, नाहीतर अतिरिक्त चार्ज लागू शकतो.
वरील महत्त्वाचे मुद्दे ते दुष्काळ वापरताना अत्यंत लक्षात घेणे गरजेचे आहे व त्यानुसारच तुम्हाला तुमच्या क्रेडिट बिल चे पैसे अदा करायचे आहेत.