Post Office Scheme 2024 : पोस्टाच्या या योजनेमध्ये दरमहा १९०० रुपये भरून मिळवा,लाखो रुपये
Post Office Scheme 2024 : हल्ली प्रत्येकाला आपल्या भविष्याची चिंता लागलेली असते. भविष्यात आर्थिक समस्या निर्माण होऊ नये म्हणून आपल्यापैकी अनेकजण वेगवेगळ्या योजना, फायनान्शियल प्लॅन आखत असतात. आणि नंतर दर महिन्याला एसआयपी, म्युचल फंड, एफडी यासारख्या अनेक गोष्टींमध्ये पैसा गुंतवत असतात.
असे करणे चांगले आहे परंतु हे करत असताना आपल्याला भविष्यात योग्य ते रिटर्न्स मिळतात की नाही हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे. जर रिटर्न्स बघून आपण पैसे गुंतवणूक केले तर भविष्यात आपल्याला जास्त पैसा मिळण्याची शक्यता असते.
आजच्या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला अशा एका सरकारी योजनेबद्दल सांगणार आहोत. ही योजना तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
हल्ली पैसे गुंतवणूक करणे म्हणजे डोक्याला ताप देखील असते. जर आपण योग्य ठिकाणी पैसा गुंतवला तरच भविष्यात मिळू शकतो, नाहीतर पैसा डुबण्याची शक्यता जास्त असते.
आजूबाजूला अशा अनेक घटना घडताना पाहायला मिळत आहे, जेथे बँक आपला पैसा होऊन जाते अशावेळी आपल्या पैसा कुठे सुरक्षित राहील याची काळजी प्रत्येकाला लागलेली असते. जर तुमच्या मनामध्ये देखील हा विचार आला असेल तर आता अजिबात चिंता करू नका.
पोस्ट ऑफिस तुमच्यासाठी एक महत्त्वाची योजना घेऊन आलेली आहे. पोस्टमध्ये पैसा एकदा का गुंतवला तर तो कधीच वाया जात नाही कारण की पोस्ट ऑफिस हे सरकारी संस्था आहे आणि सरकारी कार्यालयामध्ये गुंतवलेला पैसा हा कधीच वाया जात नाही. तुम्हाला पोस्ट ऑफिस च्या वेगवेगळ्या योजनेमध्ये गुंतवलेला पैसा योग्य तो परतावा म्हणजेच रिटर्न्स देखील मिळवून देतो.अधिक व्याजदर
भविष्यात कोणतीही जोखीम मनामध्ये न ठेवण्याची असेल तर पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवलेला पैसा हा लाभदायक ठरतो. Post Office Rd गुंतवणूकदारांना 6.5% व्याज मिळते. हे व्याज सध्या अधिक देणारे पोस्ट ऑफिसच आहेत. अनेक बँकांमध्ये व्याजदर हा कमी आहे. तुम्हाला व्याजाची चक्रवाढ तिमाही आधारावर केलेले देखील येथे तुम्हाला दिसून येईल.
पैसा राहील सुरक्षित
मला जर तुम्हाला पोस्ट ऑफिस मध्ये पैसा गुंतवणूक करायचा असेल तर पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट मध्ये तुम्ही दर महिन्याला 100 रुपये देखील गुंतवू शकता. येथे गुंतवणुकीची कमाल मर्यादा देण्यात आलेले नाही तसेच तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार दहाच्या पटीत गुंतवणूक करू शकता.
PORD मध्ये आताच करा गुंतवणूक
जर समजा तुम्ही पीओआरडीमध्ये दर महिन्याला दहा हजार रुपये गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला पाच वर्षानंतर गुंतवणूक केलेल्या पैशांच्या व मॅच्युरिटी 7,09,902 रुपये मिळतात.
यामध्ये एकूण गुंतवणूक ही 6 लाख रुपये असते आणि उर्वरित 1 लाख वरील रक्कम ही व्याज म्हणून तुम्हाला मिळते त्यानंतर जर ही रक्कम पुन्हा तुम्ही 5 वर्षासाठी गुंतवणूक करणार असाल तर तुम्हाला एकंदरीत दहा वर्षासाठी हा पैसा गुंतवणूक म्हणून ठेवता येतो अशा वेळी तुम्हाला परतावा म्हणून16,89,871 रुपये तसेच या पैशांवर 4,89,871 इतकी रुपये व्याज म्हणून मिळते.
पोस्ट ऑफिस मध्ये तुम्ही इतकी रक्कम जरी महिन्याला गुंतवली तरी तुम्हाला पैसे परत मिळण्याची शक्यता असते कारण की येथे पैसे मिळत नाही हे तुमचे सगळे पैसे सरकार वापरत असते आणि म्हणूनच तुम्हाला पैशाची शंभर टक्के आम्ही मिळते.
असे उघडा खाते
जर तुम्हाला पीओआरडी खाते उघडायचे असेल तर पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन तुम्ही हे खाते सहज उघडू शकतात तसेच तुमच्या जवळपासच्या शाखेमध्ये जाऊन तुम्हाला या योजनेबद्दल अधिकाऱ्यांना सांगायचे आहेत.
योग्य ते कागदपत्र आणि फॉर्म भरून तुम्ही ही योजना सुरू करू शकता. ही योजना तुम्ही शंभर रुपयापासून सुरू करू शकता. या योजनेमध्ये व्यक्तीला किती ही खाते उघडता येतात तसेच सिंगल व्यतिरिक्त तुम्ही तीन व्यक्तींसाठी देखील जॉईन अकाउंट उघडू शकता.
हे खाते अल्पाइन मुलांकरिता देखील पालक उघडू शकतात पोस्ट ऑफिस आरडी ची परिपक्वता पाच वर्ष इतकी असते तसेच तुम्ही हे खाते तीन वर्षांमध्ये देखील बंद करू शकता परंतु तुम्हाला कमीत कमी तीन वर्ष हे खाते चालू ठेवणे गरजेचे आहे.
कर्ज देखील मिळते.
जर तुम्हाला भविष्यामध्ये कुठेही पैसा गुंतवणूक करायचा असेल तर पोस्ट ऑफिस एक सुरक्षित ठिकाण मानले जाते कारण की पोस्ट ऑफिस मध्ये आपण जेव्हा आरडी काढतो तेव्हा या खात्यावर कर्ज देखील घेता येते.
तसेच तुमचे जर 12 हप्ते जमा झाले असतील तर तुम्हाला जमा केलेल्या रकमेच्या 50% पर्यंतच्या रकमेवर कर्ज घेता येते. कर्ज घेतलेली रक्कम तुम्ही एक रकमे किंवा हप्त्यामध्ये देखील परत करू शकता. कर्जाचा व्याजदर आरडी वरच्या व्याजापेक्षा 2 टक्के ने जास्त असतो त्यामध्ये तुम्हाला नॉमिनेशन ची देखील सोय उपलब्ध केलेली असते.