7th pay commission

7th pay commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील 18 महिन्याचा डीए एरियर, लवकरच मिळणार आनंदाची बातमी!

7th pay commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. या बातमीच्या नुसार सेवेन पे कमिशन म्हणजे सातव्या वेतन आयोगानुसार कर्मचारी आणि पेन्शन धारकांना आता अच्छे दिन येणार आहे.

यांची चांदी होईल असे म्हणायला हरकत नाही, कारण की लवकरच मोदी सरकार यांच्या खात्यामध्ये त्यांचे अडकलेले डीए चे पैसे जमा करणार आहे आणि म्हणूनच भविष्यात केंद्रीय कर्मचारी यांना अच्छे दिन येतील असे म्हणायला हरकत नाही.

महागाईच्या काळामध्ये केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आनंदाची बातमी मिळणार आहे. सातव्या वेतन आयोगानुसार त्यांची थकबाकी आहे त्यांना लवकरच डी ए मिळणार आहे त्यामुळे देखील आर्थिक बजेट सक्षम होण्याची चिन्ह या केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिसून येणार आहे म्हणूनच केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारक यांच्यात कमालीचा उत्साह दिसत आहे.

यामुळे एक कोटी लोकांना फायदा होणार आहे असे देखील म्हटले जात आहे, याबद्दल चर्चा देखील लागले जात आहे. परंतु केंद्रातील मोदी सरकारने याबाबत कोणत्याही प्रकारची घोषणा असून केलेली नाही मात्र माध्यमांमध्ये या संदर्भातील अनेक चर्चा रंगवल्या जात आहे. लवकरच मोदी सरकार याबाबत घोषणा करेल असे देखील म्हटले जात आहे.

एवढी जमा होईल DA ची थकबाकी

कोरोना व्हायरस या महामारीच्या साथीच्या आजार दरम्यान झालेले नुकसान असे कारण सांगत केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीधारकांची गेल्या 18 महिन्यांची डीए थकबाकी रोखून ठेवली होती. या थकबाकीचे पैसेही मोठ्या प्रमाणावर आहेत ही रक्कम जर केंद्रीय पेन्शन धारकांना व केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळाली तर त्यांना लॉटरी लागली आहे असे देखील होईल.

गेल्या अनेक दिवसांपासून ही थकबाकी थकलेली असल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये देण्यात यावी अशी विनंती देखील करण्यात आली होती परंतु सरकारकडून या विनंती बद्दल कोणतेही पाहून उचलले गेलेले नाही. या मागणीबद्दल अधिकृत घोषणा देखील सरकारने केलेली नाही.

लवकरच म्हणजेच पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधी सरकार पेन्शनधारकांना भेट देण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर असे झाल्यास उच्च पदावर असणारे अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये दोन लाखापेक्षा अधिक रक्कम जमा होण्याची शक्यता आहे.

7th pay commission आनंदाची बातमी

डी संदर्भात म्हणजेच डीए वाडी संदर्भात पेन्शनधारकांना व केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी देखील आहे पेन्शन धारकाच्या डीए मध्ये सुमारे चार टक्के वाढ होण्याची शक्यता आहे सोबतच डी ए 46 टक्क्यापर्यंत वाढेल.

सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 टक्के डीए चा लाभ दिला जात आहे आणि जर डीए भविष्यात वाढला तर एक जुलैपासून त्याचे दर लागू होतील आणि म्हणजेच जेव्हा मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करेल तेव्हा त्यांना चांगली रक्कम मिळेल अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे जर तुम्ही देखील केंद्रीय कर्मचारी असेल तर सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला देखील अच्छे दिन येतील यात कोणत्याही प्रकारची शंका नाही.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *