फक्त 50000 रुपयांमध्ये “या” व्यवसायाची सुरुवात करून महिन्याला लाखो रुपये कमाऊ शकता | T-Shirt Printing Business
T-Shirt Printing Business : जेव्हा आपण एखादा उद्योग व्यवसाय सुरू करायचे ठरवत असतो तेव्हा सर्वप्रथम आपणास एकच प्रश्न पडतो तो म्हणजे कोणता व्यवसाय आपण करायला हवा.मग खुप व्यवसाय बघितल्यावर आपण एखादा व्यवसाय निवडत असतो.
मग त्या व्यवसायासाठी आपणास भांडवल किती लागेल त्यातुन आपणास किती नफा प्राप्त होईल.हे बघत असतो.थोडक्यात सांगायचे म्हटले तर कमी पैशांची गुंतवणूक करून देखील आपणास जास्त नफा प्राप्त होईल अशा एखाद्या व्यवसायाच्या शोधात आपण असतो.
आज असे अनेक व्यवसाय आपणास करण्यासाठी उपलब्ध आहेत जे कमी गुंतवणूक करून आपण करू शकतो अणि त्यात भरपुर नफा प्राप्त करू शकतो.टी शर्ट प्रिंटिंग हा सुद्धा एक असाच एक कमी गुंतवणूकीत जास्त नफा प्राप्त करून देणारा फायदेशीर व्यवसाय आहे.सध्याचे युग हे तरूणांचे युग आहे.आज सर्वच तरूण मुले टी शर्ट परिधान करणे अधिक पसंत करतात.
शाळेत महाविद्यालयात शिकत असलेले तरूणच नव्हे तर महाविद्यालयात शिकत असलेल्या तरूणी देखील फॅशनेबल टी शर्ट परिधान करतात.ह्या फॅशनच्या दुनियेत आपले व्यक्तिमत्व उठावदार दिसावे म्हणून शहरी भागात राहत असलेले लहान मुलांपासून वयोवृदध व्यक्ती देखील टी शर्ट घालणे अधिक पसंत करतात.
टी शर्ट प्रिंटिंग हा एक असा व्यवसाय आहे ज्याची बाजारात मागणी खुप आहे.यात गुंतवणूक फार थोडी करावी लागते अणि यात कमाईची संधी फार अधिक प्रमाणात आहे.कारण आज लहानांपासुन मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच वेगवेगळ्या प्रकारचे फॅशनेबल टी शर्ट परिधान करायला आवडते.
टी शर्ट प्रिंटिंगचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला लाखोचे भांडवल देखील लागत नाही फक्त ५० हजार रुपयांपर्यंत गुंतवणूक करून देखील आपण ह्या व्यवसायास अगदी सहजपणे प्रारंभ करू शकतो.हा एक असा फायदेशीर व्यवसाय आहे ज्यात ५० हजार रुपये इतकी गुंतवणूक करून आपण 100000 पर्यंत महिन्याला कमाई करू शकतो.
म्हणजे जितका पैसा ह्या व्यवसायात आपण भांडवल म्हणून गुंतवतो तेवढी एक महिन्यात आपली कमाई ह्या व्यवसायात होऊ शकते.अणि सध्या बाजारात सुद्धा साध्या टी शर्ट पेक्षा प्रिंट केलेल्या टी शर्टला अधिक मागणी आहे.ज्यामुळे ह्या व्यवसायात प्रगतीची संधी देखील फार विपुल प्रमाणात आहे.
फक्त हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरूवातीला आपणास ५० हजारांपर्यंत प्राथमिक गुंतवणूक करावी लागेल यानंतर जसजसा आपला व्यवसाय वाढु लागेल,आपल्या व्यवसायाची लोकांमध्ये प्रसिद्धी होऊ लागेल.
तसतशी आपल्या दुकानात येत असलेल्या कस्टमर मध्ये देखील वाढ होऊ लागेल.आपल्या व्यवसायाची ख्याती वाढावी म्हणून आपण याविषयी वेगवेगळ्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर देखील त्याची मार्केटिंग करू शकतो.आपल्या नवीन उद्योग व्यवसायाला लोकांपर्यंत पोहचवू शकतो.
T-Shirt Printing Business सुरू करण्यासाठी किती खर्च लागतो?
टी शर्ट प्रिंटिंग हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपणास एक प्रिंटिंग मशिन विकत घ्यावे लागेल हया मशिनची किंमत साधारणत 40 ते 50 हजार इतकी असु शकते.
यात आपण साधी सफेद रंग असलेल्या टी शर्टला 120 रूपये किंमतीने प्रिंट करू शकतो अणि 120 रूपयांमध्ये प्रिंट केलेल्या एका टी शर्टला 250 रूपयांमध्ये विकु शकतो.म्हणजे एका टी शर्ट मागे आपण 130 रूपये इतका नफा प्राप्त करू शकतो.असे आपण दिवसभरात पाहीजे तितके टी शर्ट प्रिंटिंग करून पाहीजे तितकी कमाई करू शकतो.
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम मॅन्युअल मशिनचा वापर करता येईल.मॅनयुअल मशिनच्या साहाय्याने आपणास एक किंवा दोन मिनिटात टी शर्ट प्रिंटिंग करता येते.
अशा पद्धतीने आपण एका दिवशी 50 टी शर्ट प्रिंट केले तरी देखील दरमहा आपणास 1500 टी शर्ट प्रिंट करता येतात अणि एका टी शर्ट मागे 130 रूपये प्रमाणे 130 रूपये मिळाले तरी आपण दिवसाला 50 टी शर्ट मागे 6500 रूपये इतकी कमाई करू शकतो.म्हणजे महिन्याला 130000 इतकी कमाई आपणास करता येते.
पुढे ह्या व्यवसायादवारे आपल्या कमाई मध्ये वाढ सुरू झाल्यावर आपण आॅटोमॅटिक मशिनचा देखील वापर करू शकतो.आॅटोमॅटिक मशिनचा वापर करून टी शर्ट प्रिंटिंग केल्याने आपणास कमी कालावधीत जास्तीत जास्त टी शर्ट प्रिंट करता येतील.
ज्याने आपली विक्री अणि कमाई ह्या दोघांमध्ये वाढ होण्यास मदत होईल.अशा पद्धतीने आपण खुप कमी पैशांची गुंतवणूक करून टी शर्ट प्रिंटिंगचा व्यवसाय सुरू करून जास्तीत जास्त नफा कमवू शकतो.