अरे बापरे !! तुमच्या नावावर दुसऱ्याचा नंबर, लगेच चेक करा आणि बंद करा | Sim Card
Sim Card : तुम्ही जर 1 किंवा 2 सिम वापरत असाल आणि याच्या अगोदर तुम्ही वेगवेगळे नंबर तुमच्याकडे असतील, तुमचा नंबर इतर कोणी वापरत असेल तर त्या व्यक्तीकडून धोका होऊ शकतो याची जाणीव ठेवून दूरसंचार विभागाने हे पाऊल उचलले आहे, तर तुमच्या नावावर एकूण किती नंबर आहेत ही पाहण्याची सुविधा दूरसंचार विभागाने केलेली आहे.
नंबर बंद करा (SIM Card)
नको असलेले नंबर तिथून तुम्ही रिपोर्ट करू शकता आणि ते नंबर बंद सुद्धा करू शकता, ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी पाहायची नंबर कसे लॉक करायचे याची सविस्तर माहिती इथे पाहणार आहोत.
मित्रांनो भारत सरकारच्या दूरसंचार विभागामध्ये नवीन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे, यामध्ये तुमचं सध्या चालू असलेला मोबाईल नंबर टाकून तुम्ही तुमच्या नावावर असलेले संपूर्ण नंबर पाहू शकता.
👇👇
तुमच्या नावावर किती नंबर आहेत पाहण्यासाठी येथे क्लिक करा
असे करा चेक (Sim Card)
- तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वरून दूरसंचार विभागाच्या त्या पोर्टलवर जायचं आहे, तिथे गेल्यानंतर तुम्हाला सध्या चालू असलेला नंबर टाकायचा आहे.
- नंबर टाकल्यानंतर रिक्वेस्ट ओटीपी (Request OTP) या बटनाला क्लिक करून वन टाइम पासवर्ड म्हणजे ओटीपी घ्यायचा आहे.
- आणि त्यानंतर सविस्तर माहिती तिथे दिसेल ज्यामध्ये तुमच्या जेवढे सिम आहेत तेवढे नंबर (Number) दिसतील.
- जास्तीत जास्त ची मर्यादा नऊ नंबर पर्यंत या पोर्टलवर ठेवण्यात आली आहे.
- नऊ पेक्षा जास्त नंबर तुमच्या नावावर असतील तर त्यासाठी वेगळा फॉर्म दिला जातो तो फॉर्म तुम्हाला भरावा लागेल हा फॉर्म भरण्यासाठी तिथे पर्याय उपलब्ध आहे.
- तुम्हाला नको असलेल्या नंबर खाली गरज नाही (Not Required) हा ऑप्शन येईल.
- वर तुमचं नाव टाकून ते नंबर तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि रिपोर्ट या बटनाला क्लिक करायचा आहे.
- क्लिक केल्यानंतर तुम्हाला रेफरन्स आयडी येईल तो आयडी जपून ठेवायचा आहे जोपर्यंत तुमचं सिम बंद होत नाही तोपर्यंत तरी.