Shop act registration : घरबसल्या मोबाईलवरून काढा शॉप ऍक्ट लायसन्स फक्त 10 मिनिटांत
shop act registration : तुम्ही जर छोटा मोठा व्यवसाय करत असाल किंवा एखादी टपरी चालवत असाल, पुढे व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्हाला बँकेचे लोनची गरज पडते, बँकेत अकाउंट काढण्याची गरज पडते यासोबतच विविध कामासाठी शॉप ऍक्ट लायसन्स काढणे अनिवार्य असत.
तुम्ही जर दुकान चालवत असाल तर त्याची ओळख म्हणून तुम्हाला शॉप ऍक्ट लायसन्स काढणं गरजेचं असतं आणि शासनाच्या नियमाप्रमाणे हे आवश्यक आहे. हे काढण्यासाठी तुम्हाला खूप किरकोळ रक्कम त्यांच्या ऑनलाईन वेबसाईटवर भरावी लागते.
पण जर तुम्ही हे लायसन्स बाहेर काढलं तर 500 ते 600 रुपये दर आकारला जातो आणि तुमची मोठी लूट तिथे केल्या जाते तुम्ही गरज असल्यामुळे त्यावेळेस तुम्ही पाहिजे तेवढे पैसे द्यायला तयार असतात.
पण हे शॉप ॲक्ट लायसन्स तुम्ही फक्त दहा मिनिटात घरबसल्या काढू शकता त्याची प्रोसेस इथे आपण पाहणार आहोत कसा अर्ज करायचा त्यासाठी किती रुपये तुम्हाला भरावे लागतात याची सुद्धा माहिती तुम्हाला इथे मिळणार आहे.
👇👇👇👇
शॉप ऍक्ट काढण्यासाठी येथे क्लिक करा
एक दुकानाचे नोंदणी प्रमाणपत्र असते आणि एक सूचना दिल्याबद्दल चे प्रमाणपत्र असते यामध्ये जर तुम्ही शून्य ते नऊ जणांसोबत काम करत असाल तर सूचना दिल्या बाबतचे प्रमाणपत्र तुम्हाला मिळते जर नऊ पेक्षा अधिक व्यक्ती तुमच्या दुकानांमध्ये किंवा व्यवसायामध्ये काम करत असल तर तुम्हाला दुकाने आस्थापना नोंदणीचा दाखला काढावा लागतो दोन्हीच्या प्रोसेस सर्वसाधारण सारख्याच आहेत
आवश्यक कागदपत्र (shop act registration)
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- दुकानाचा फोटो मराठी पाठीसह
- तुमचा पासपोर्ट साईज फोटो
- तुमच्या सहीचा फोटो
- स्वयंघोषणापत्र
वर दिलेली कागदपत्र तुमच्याकडे तयार असतील तर तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पहिले नोंदणी करून घ्यायचे आहे नोंदणी तुम्ही दोन प्रकारे करू शकता ओटीपी द्वारे किंवा तुमच्या आधार द्वारे इथे तुम्हाला तुमचं नाव टाकून आधार नंबर टाकून नोंदणी करायचे आहे.
👇👇👇👇
संपूर्ण प्रोसेस वाचण्यासाठी येथे क्लिक करा
शॉप ॲक्ट चा फायदा (Shop act registration)
तुमच्याकडे जर शॉप ऍक्ट असेल तर तुम्हाला कोणते मोठ्या कंपनीत नोंदणी करण्यासाठी (वेंडर रजिस्ट्रेशन) साठी उपयोगाला येतो, प्रोप्रायटर शिप मध्ये व्यवसाय करत असाल तर बँकेमध्ये अकाउंट काढण्यासाठी, बँकेचे लोन काढण्यासाठी तसेच तुमचा व्यवसायाची ओळख म्हणून या दाखल्याचा उपयोग तुम्ही करू शकता.