PF account balance अशा प्रकारे करा चेक,एका एसएमएसच्या माध्यमातून मिळेल सर्व माहिती
PF Account Balance : जर तुमचे देखील पीएफ खाते असे असेल तर अशावेळी तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत किती पैसे जमा झालेला आहे, या संबंधित माहिती तुम्ही फक्त एका एसएमएसच्या माध्यमातून आता घरबसल्या जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील आणि या स्टेप्स खूपच सोप्या आहेत.
आपल्यापैकी अनेकांनी पीएफ खाते हे नाव ऐकले असेल परंतु अनेकांना या खात्याबद्दल फारशी माहिती नसते. जर तुम्ही खाजगी नोकरी करत असाल तर अशावेळी तुमच्या पगारातील एक विशिष्ट पैसा पीएफ खात्यामध्ये जमा होत असतो. सोबतच तुमच्या कंपनीकडून देखील काही योगदान या खात्यामध्ये पैसे जमा करण्यासाठी केले जाते. या खात्यामध्ये सरकारकडून वर्षाला काही ठराविक रक्कम व्याजदर म्हणून देखील तुम्हाला मिळत असतो.
ईपीएफ खाते हे सरकारी संस्था कर्मचारी भविष्य निधी संघटन अंतर्गत उघडले जाते यालाच आपण पीएफ खाते असे म्हणतो. जर तुम्ही देखील पीएफ खातेधारक असाल तर तुम्हाला काही सोप्या पायऱ्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या खात्यामध्ये असेल असलेला पैसा जाणून घेऊ शकता चला तर मग जाणून घेऊया नेमकी प्रक्रिया असते तरी काय…
अशाप्रकारे चेक करा पीएफ खात्यातील बॅलन्स
खात्यातील पैसा चेक करण्यासाठी तुम्हाला ईपीएफओ च्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल. वेबसाईटवर गेल्यावर सर्विस टॅब वर क्लिक करून फोर एम्पलोयी सेक्शन आपल्याला निवडायचे आहे. यानंतर मेंबर पासबुक वर क्लिक करून आपल्याला यु ए एन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे. आता तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर तुमच्या पीएफ खात्यातील संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसू लागेल.
एसएमएस द्वारे चेक करा PF Account Balance
जर तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यातील पैसे किती जमा झालेले आहे हे जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही एसएमएसच्या माध्यमातून देखील आता जाणून घेऊ शकता परंतु या प्रक्रियेचा वापर करत त्यांना तुम्हाला तुमचा यु ए एन तुमच्या मोबाईल फोनची रजिस्टर केलेला असायला हवा.
पीएफ खात्यातील पैसा बॅलेन्स जाणून घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल रजिस्टर असलेल्या नंबर वरून 773829899 या नंबर वर ‘EPFOHO UAN ENG’ असा एक एसएमएस पाठवावा लागेल यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये असलेला पैसा एका एसेमेस च्या माध्यमातून जाणून घेता येईल.
मिस कॉल च्या माध्यमातून जाणून घ्या पीएफ बॅलन्स
खात्यामध्ये जमा असलेला पैसा आता आपण मिस कॉल च्या माध्यमातून देखील लगेचच जाणून घेऊ शकतो. त्यासाठी आपल्याला 011-22901406 या टोल फ्री नंबर वर रजिस्टर मोबाईल नंबर द्वारे मिस कॉल द्यावा लागेल. परंतु या पद्धतीचा वापर करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड आणि तुमचा मोबाईल नंबर युएएनला रजिस्टर असणे गरजेचे आहे तरच तुम्हाला मिस कॉल च्या माध्यमातून तुमच्या पीएफ खात्यामध्ये असलेला पैसा जाणून घेता येईल.
उमंग ॲप्लिकेशन
पीएफ खात्यातील पैसा व त्या संबंधित अन्य माहिती जाणून घेण्याकरिता भारत सरकारने एक ॲप्लिकेशन देखील बनवलेले आहे ते अप्लिकेशनची नाव आहे उमंग एप्लीकेशन. या उमंग एप्लीकेशनच्या मदतीने तुम्ही सहजच पीएफ संदर्भातील सगळी माहिती एका क्लिकवर जाणून घेऊ शकता.
हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअर मध्ये जावे लागणार आणि त्यानंतर उमंग ॲप्लिकेशन नाव सर्च करून हे डाउनलोड करावे लागेल. ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला यु ए एन आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे लागेल असे केल्यानंतर तुम्ही तुमचे पासबुक तपासू शकता किंवा बॅलन्स देखील जाणून घेऊ शकता सोबतच अनेक सरकारी सुविधांचा लाभ तुम्हाला या ॲप्लिकेशनच्या मदतीने घेता येईल.
ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याकरता किंवा अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यातील पैसा बॅलन्स चेक करायचा असेल तर यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल.
या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला यु ए एन सक्रिय करावं लागणार आहे यालाच आपण युनिव्हर्सल अकाउंट नंबर असे म्हणतो. येथे क्लिक केल्यानंतर यु ए एन आधार कार्ड पॅन कार्ड यासारखी महत्त्वाची माहिती तुम्हाला भरावी लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला गेट ऑथरायझेशन वर क्लिक करायचं आहे तिथे गेल्यावर तुम्हाला ही माहिती वेरिफिकेशन करण्याकरिता एक एसएमएस ओटीपी च्या माध्यमातून मिळेल.
आता तुम्हाला ओटीपी टाकावा लागेल आणि त्यानंतर तुम्हाला यु ए एन वर क्लिक करायचे आहे असे केल्यानंतर तुम्हाला एक एसएमएस येईल त्यामध्ये तुम्हाला पासवर्ड चा उपयोग करून लॉगिन करायचे आहे. हा पासवर्ड तुम्ही नंतर बदलू देखील शकता. रजिस्ट्रेशन केल्यानंतर पुढील सहा तासांमध्ये तुम्हाला तुमच्या खात्यातील महत्त्वाची माहिती पाहायला मिळेल. ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यासाठी कमीत कमी सहा-सात तास तुम्हाला वाट पहावी लागेल.