Mini Tractor (Power Tiller) : मशीन 1 कामे अनेक ! शेतकऱ्यांना आता मजूरांची चिंता नाही
Mini Tractor (Power Tiller) : भारत हा कृषिप्रधान देश आहे, भारतात मोठ्या प्रमाणात शेती हा व्यवसाय केला जातो. शेती करताना येणाऱ्या अडचणी, शेतीसाठी मजूरही मिळत नाहीत यासाठी आपला शेतकरी वर्ग नेहमीच त्रस्त असतो.
तर आपण शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन येत आहोत ते म्हणजेच आता शेतकरी बांधवांना मजूर न मिळण्याची चिंता काही प्रमाणात तरी कमी होऊ शकते.
कारण ही मशीन बऱ्याच मजुरांची संख्या वाचून लवकरात लवकर कमी वेळेत जास्त काम करते. सगळी कामे करते हि 1 मशीन.
पेरणी पासून ते काढणीपर्यंतची सर्व कामे करते ही एक मशीन ; पहा कोणती आहे ही मशीन ? त्याचा शेतकऱ्यांना कशाप्रकारे होतो फायदा.
शेतातील पेरणी पासून कापणी पर्यंत सर्व कामे ही शेतकऱ्यांना मजुराशिवाय देखील करता येणार आहेत. ती कशी ते जाणून घेऊया.
शेतीसाठी मजूर मिळणे देखील कमी झालेले आहे ; तर आता शेतकऱ्यांना मजूर मिळण्यासाठी मजुरांसाठी चिंता करण्याची काहीच गरज नाही.
ही मशीन Power Tiller आहे Power Weeder आहे की Mini Tractor हे तुम्हीच पहा सविस्तर माहिती..
Mini Tractor(Power Tiller)
जेवढी कामे शेतकरी ट्रॅक्टर द्वारे करतो; तेवढीच कामे ही छोटी मशीन करते. म्हणूनच या मशीनला मिनी ट्रॅक्टर देखील म्हणता येईल.
आणि ट्रॅक्टर पेक्षा कमी पैश्यामधें येते हि मशीन. ट्रॅक्टरच्या किमतीपेक्षा या मशीनची किंमत खूपच कमी आहे; तर शेतकऱ्यांसाठी उपयोगी ठरणारी ही मशीन व त्याद्वारे केली जाणारी कामे खरोखरच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहेत.
ही मशीन शेतकऱ्यांसाठी खूपच उपयोगी ठरत आहे ह्या एका मशीनच्या साह्याने आपण अनेक कामे करू शकतात.
Mini Tractor (Power Tiller)कोणकोणती कामे करते ही मशीन ?
- बागेची मशागत ; या मशीनला फवारणी पंप देखील लावता येतो.
- तसेच शेतातील जनरेटर म्हणून देखील उपयोग होतो.
- जमिन रोटा व्हेटर देखील करता येते.
- जमिनीची वखरणी या मशीनद्वारे करता येते.
- मशीनला तुम्ही ट्रॉली देखील लावू शकता.
- या मशीनला 7 HP इंजिन लावलेले आहे.
- या मशीन सोबतच तुम्हाला रोटा व्हेटर, वखर, गेजपट्टा इ. सामग्री मिळते.
- Power Tiller ही मशीन पेट्रोलवर चालते.
कमी होणारा मजुराचा खर्च देखील या मशीनद्वारे तुम्ही वाचवू शकता. खरोखरच ही मशीन शेतीसाठी उपयोगी ठरणारी आहे