Majhi Kanya Bhagyashree Yojana : 1 मुलगी 50 हजार, 2 मुली असतील तर 25-25 हजार मिळणार, अर्ज डाउनलोड करा
Majhi Kanya Bhagyashree Yojana : महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांमधील एक योजना म्हणजे “माझी कन्या भाग्यश्री योजना” या मध्ये बदल करून सुधारित नवीन योजना लागू करण्यासाठी शासनाने निर्णय जाहीर केला आहे.
तुम्हाला या योजनेसाठीचा अर्ज सुद्धा मिळणार आहे अर्जाचा नमुना खालील करून तुम्ही डाऊनलोड करू शकता आणि सविस्तर माहिती वाचून त्याप्रमाणे अर्ज सादर करू शकता.
या योजनेमध्ये एक मुलगी असेल तर 50 हजार रुपये आणि दोन मुले असतील तर 25-25 हजार रुपये असे 50 हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत.
या योजनेचा मुख्य उद्देश आहे मुलींचे शिक्षण आरोग्यामध्ये सुधारणा करणे, त्यांचे उज्वल भविष्य साठी आर्थिक तरतूद करणे, मुलींच्या जन्मामध्ये समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे.
बालविवाह थांबवणे आणि मुलीचा जन्मदर वाढवणे इत्यादी.माझी कन्या भाग्यश्री ही योजना महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत्या येते त्याचा सर्व खर्च महाराष्ट्र शासन करते.
सुकन्या समृद्धी योजना आहे केंद्र शासनाच्या अखत्यारीत्या येते त्यामुळे या दोन्ही योजना वेगवेगळ्या आहेत.माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी काय पात्रता असायला पाहिजे अर्ज कुठे करायला पाहिजे याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
पात्रता (Majhi Kanya Bhagyashree Yojana)
दिनांक 01 ऑगस्ट 2017 पासून ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 7.5 लाख रुपयापर्यंत आहे असे समाजातील सर्व घटकांसाठी ही योजना लागू केलेली आहे.
किती लाभ मिळतो
- एका मुलीनंतर मातापित्याने शस्त्रक्रिया केल्यानंतर मुलींचे नावे 50 हजार रुपये बँकेत मुदत ठेव म्हणून गुंतवण्यात येतात.
- दोन मुली नंतर माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर पहिल्या व दुसऱ्या मुलीचे नावे प्रत्येकी 25 हजार इतकी रक्कम मुदत ठेव म्हणून ठेवण्यात येते.
योजनेच्या अटी शर्ती
- सदरील योजना बँक ऑफ महाराष्ट्र मार्फत राबविण्यात येईल त्यासाठी बँकासोबत करानामा केला आहे.
- मातेने/पित्याने कुटुंबनियोजनाचे शस्त्रक्रिया केल्याचा दाखला योजनेचा लाभ घेण्यापूर्वी सादर करणे आवश्यक राहील.
- माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजनेचा लाभ 01 ऑगस्ट 2017 रोजी जन्मलेल्या व त्यानंतरच्या मुलींना घेता येईल.
- पहिले अपत्य मुलगा असल्यास दुसरे अपत्य मुलगी झाल्यास किंवा पहिले अपत्य मुलगी असल्यास व दुसरे मुलगा झाल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही.
- लाभार्थी मुलीचे वडील महाराष्ट्र राज्याचे मुळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना बालिकेचा जन्म नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- दुसऱ्या प्रसूतीच्या वेळेस जुळ्या मुली झाल्या तर त्या मुली योजनेस पात्र असतील.
- प्रत्येक लाभार्थी मुलींसाठी स्वतंत्र्य खाते बँकेत उघडण्यात येईल तसेच मुलीच्या नावे रक्कम बँकेत जमा करण्यात येईल.
- नंतर बँकांकडून देण्यात आलेला मूळ गुंतवणूक प्रमाणपत्राचे प्रत लाभार्थ्यास देण्यात येईल व त्याचे छायांकित परत शासकीय कार्यालयात पाठवले नाही.