LPG Gas Subsidy 2024 : सरकार एलपीजी सिलेंडरवर देत आहे सबसिडी, पहा कोणाला मिळेल फायदा
LPG Gas Subsidy 2024 : मोदी सरकार आल्यापासून कित्येक योजना आल्या आणि गेल्या पण यामध्ये एलपीजी सबसिडी हा एक महत्त्वाचा घटक होता.
सर्व नागरिकांना एलपीजी सिलेंडर वर सबसिडी मिळायची आणि ती सबसिडी थेट बँक खात्यात ट्रान्सफर केली जाईल.
कालांतराने ही सबसिडी बंद झाली आणि त्यामध्ये Give it up चा ऑप्शन सरकारने दिला की ज्यांना आवश्यकता नाही किंवा ज्यांचे उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त आहे.
अश्याना सबसिडी न देण्याचा निर्णय सुद्धा जाहीर केला पण त्यानंतर उज्वला योजना आली,आणि उज्वला योजना मध्ये महिलांसाठी भारत सरकारने एलपीजी गॅस मोफत देण्याची सुविधा केली.
आज भारतभर या योजनेचा फायदा सर्व महिलांना होतो या योजनेअंतर्गत 12 सिलेंडर घेणाऱ्यांना सरकारमार्फत सबसिडी दिले जाते.
जर तुमचे उत्पन्न एका लाखापेक्षा कमी असेल तरीही सबसिडी थेट तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर होते, सबसिडीची अमाऊंट 150 ते 200 रुपये एका सिलेंडरला मिळते.
ही सबसिडी तुम्हाला मिळते का नाही हे पाहण्यासाठी खालील लिंक दिलेली आहे या लिंक वर जाऊन तुम्ही तुमचा ग्राहक क्रमांक टाकून सबसिडीची माहिती घेऊ शकता.
उज्वला योजना (LPG Gas Subsidy 2024)
एक लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर या सुविधेचा लाभ घेऊ शकत नाहीत प्रधानमंत्री च्या विविध योजना पैकी असलेली उज्वला योजना ही फक्त महिलांसाठी होती.
यामध्ये फक्त महिलांना मोफत गॅसचे कनेक्शन दिले जात होते ही योजना आता सध्या चालू आहे या योजनेमध्ये सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता.
जर या योजनेमधून तुम्ही महिन्याला एक याप्रमाणे वर्षाला 12 सिलेंडर किंवा टाक्या घेत असाल तर तुम्हाला हे सबसिडी मिळते.
हे सबसिडी काही कंपनीच्या सिलेंडरवर उपलब्ध आहे जसे की HP, Indane आणि Bharat गॅस या भारताच्या अधिकृत गॅस पुरवठा करणाऱ्या कंपन्या आहेत.
या सिलिंडर वर मिळते सबसिडी (LPG Gas Subsidy)
याव्यतिरिक्त कोणत्या कंपनीच्या टाक्यावर किंवा कनेक्शन वर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे सबसिडी मिळत नाही किंवा तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकत नाही.
खालील लिंक वर जाऊन तुम्हाला सबसिडी मिळते की नाही हे चेक करा तुम्ही जर पात्रतेत बसत असाल, किंवा तुम्ही Give it up चा ऑप्शन दिला असेल तर ते Disable करण्याची सुविधा सुद्धा येथे दिलेली आहे.