Kisan Credit Card : हे कार्ड असेल तर शेतकऱ्यांना मिळेल 3 लाखापर्यंत कर्ज; पहा अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया..!!
Kisan Credit Card : आज आपल्या भारत देशातील प्रत्येक शेतकरी कडे आपले स्वताचे एक किसान क्रेडिट कार्ड असावे.असे केंद्र सरकारने सांगितले आहे.किसान क्रेडिट कार्ड ही शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली विशेष योजना आहे.
ह्या योजनेचा मुख्य हेतु हा शेतकरयांना शेती संबंधी कार्यात अर्थसाहाय्य प्रदान करणे हा आहे.हे अर्थसाहाय्य प्रदान करण्यासाठी शासनाकडुन शेतकरयांना कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पुढील बाबींसाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते -किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना बी बियाणे,खत कीटकनाशके,इत्यादी प्रकारच्या शेतीच्या कामाकरीता कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
कोणकोणते शेतकरी अर्ज करू शकतात?
किसान क्रेडिट कार्ड बनविण्याकरीता सर्वप्रकारच्या शेतकरयांना अर्ज करता येतो.यात स्वताच्या मालकीची जमीन असणारे,इतरांची जमीन भाडेतत्त्वावर कसणारे, तसेच सामायिक शेती करणारा शेतकरी देखील किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्यासाठी पात्र ठरतो.याचसोबत पशुपालन मत्स्यपालन करतात असे शेतकरी देखील ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
भारत सरकारने २०१९ मध्ये भारत सरकारच्या वतीने एक परिपत्रक जारी करण्यात आले होते.त्यात असे देण्यात आले होते की भारतात सध्या ६.९५ कोटी इतके शेतकरी किसान क्रेडिट कार्डचा वापर करीत आहे.
असे असुनही बरेच शेतकरी किसान क्रेडिट कार्ड अणि त्यापासून शेतकरयांना उपलब्ध करून दिल्या जात असलेल्या कर्जापासून अद्यापही वंचित आहेत असे शासनाच्या निदर्शनास आले.
यामुळेच शासनाने जास्तीत जास्त शेतकरयांना किसान क्रेडिट कार्डचा लाभ मिळावा यासाठी २०२० मध्ये पंतप्रधान किसान सम्मान निधी योजनेच्या सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना ह्या योजनेत समाविष्ट करून घेण्याची मोहीम राबवली होती.
या मोहीमेचा एक महत्वाचा घटक म्हणून किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी करावयाचा अर्ज हा पंतप्रधान किसान सम्मान निधी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर सर्व शेतकऱ्यांना उपलब्ध देखील करून देण्यात आला होता.
पंतप्रधान किसान सम्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना हे क्रेडिट कार्ड केंद्र सरकारच्या वतीने २०२० मध्ये उपलब्ध करून देण्यात आले होते.
अर्ज डाउनलोड कसा करायचा? अर्ज कसा करायचा?
KCC किसान क्रेडिट कार्ड योजनेचा अर्ज प्राप्त करण्यासाठी सर्वप्रथम आपणास पीएम किसान सम्मान निधी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.यानंतर आपल्यासमोर ह्या वेबसाईटचे होमपेज ओपन होईल होमपेजवर उजव्या बाजूला कोपरयामध्ये आपल्याला Download KCC Form ह्या नावाचा एक पर्याय दिसुन येईल.
- ह्या डाऊनलोड केसीसी फाॅमवर क्लिक केल्यावर आपल्यासमोर क्रेडिट कार्ड साठीचा अर्ज ओपन होताना दिसुन येईल.
- यानंतर Loan application form for agriculture credit for PM Kisan Beneficiary -पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी कृषी कर्जाचा अर्ज असे ह्या अर्जाचे टायटल आपल्यासमोर येईल.
- यानंतर आपणास हा अर्ज व्यवस्थित भरून घ्यायचा आहे.अर्जामध्ये टु ब्रॅच मॅनेजर ह्या नावाखाली आपले खाते असलेल्या बॅकेचे नाव अणि शाखा टाकायची आहे.
- यानंतर अर्जात आॅफिस युझ मधील माहीती विचारली जाईल जी बॅकेने भरायची असते.शेतकरी वर्गाला यात काहीही तपशील भरावा लागत नाही.बी सेक्शन मध्ये आपणास कोणत्या प्रकारचे केसीसी हवे आहे नवे की जुने ते टाकायचे आहे.का जून्या किसान क्रेडिट कार्डच्या कर्ज मर्यादा मध्ये वाढ करायची आहे.तसेच किती कर्ज हवे आहे ते टाकायचे आहे.
- सी सेक्शन मध्ये आपणास अर्जदाराचे नाव टाकायचे आहे अर्जदाराचे पैसे ज्या बॅक खात्यात जमा होतात त्याचा खाते क्रमांक टाकायचा आहे.जर अर्जदाराला प्रधानमंत्री सुरक्षा योजना जीवनज्योती बिमा योजनेअंतर्गत इन्शुरन्स प्राप्त करायचा असल्यास यस ह्या पर्यायावर टिक करायचे आहे.
- पण यस केल्यावर प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेसाठी दरमहा ३३० रूपये अणि प्रधानमंत्री बिमा सुरक्षा योजना करीता दरमहा ३४२ रूपये आपल्या खात्यातुन दरमहा कट केले जातात.पण ह्या योजनेसाठी दोन लाखाचे कवच देखील आपणास दिले जाते.
- सेक्शन डी मध्ये आपण सध्या कोणते कोणते लोन घेतले आहे त्याची माहिती द्यायची आहे.यात कर्ज घेतलेल्या बॅकेचे नाव शाखा कर्जाची रक्कम एकुण थकबाकी इत्यादी माहीती भरायची आहे.
- ई सेक्शन मध्ये आपल्या जमिनी विषयी माहिती भरायची आहे.यात गावाचे नाव,सर्वे नंबर,आपण शेती करत असलेली जमीन आपली स्वताच्या मालकीची आहे की आपण त्यावर भाडेतत्त्वावर तसेच सामायिक पद्धतीने शेती करत आहोत हे द्यायचे आहे.
- आपल्याकडे किती एकर शेतजमीन आहे हे द्यायचे आहे.यात कोणकोणती पिके घेतली जातात हे देखील भरायचे आहे.एफ सेक्शन मधील माहीती ही मत्स्यपालन पशूपालन व्यवसाय करत असलेल्या शेतकरी वर्गासाठी आहे यात त्यांना आपल्याकडे दुध देत असलेले किती प्राणी आहे, मेंढ्या,कोंबड्या,शेळ्या किती आहेत.हे ह्या रकान्यात भरायचे आहे.
- आपण कोणत्या पद्धतीने मत्स्यपालन करतो हे द्यायचे आहे.यानंतर सिक्युरिटी म्हणून आपण कुठली तरी एक मालमत्ता द्यायची आहे.अणि आपली स्वाक्षरी करावयाची आहे.खाली Acknowledgement हा भाग देखील असतो पण यात बॅकेकडुन माहीती भरली जाते.यानंतर संपूर्ण अर्ज भरून झाल्यावर शेतकऱ्यांना भरलेल्या अर्जाची एक प्रिंट काढुन घ्यायची आहे अणि बॅकेत जमा करायची आहे.
- अर्जासोबत काही महत्वाची कागदपत्रे देखील जोडायची आहेत.उदा, आधार कार्ड,पॅन कार्ड,पासपोर्ट साईज फोटो,सातबारा उतारा,आठ अ उतारा,इतर कुठल्याही बॅकेकडुन कर्ज न घेतल्याचे शपथपत्र,वरील सर्व कागदपत्रांसोबत अर्ज जमा केल्यानंतर दोन ते तीन आठवड्यात आपले कार्ड आपल्या घरी बॅकेच्या वतीने पाठवले जाते.
जर आपल्याला आॅनलाईन पदधतीने अर्ज करायचा असेल तर आपण एखाद्या सीएससी सेंटर मध्ये जाऊन निर्धारित शुल्क भरून देखील ह्या अर्जासाठी फाॅम भरू शकतो.घरबसल्या स्वता अर्ज करून वैयक्तिकरीत्या आपणास किसान क्रेडिट कार्ड करीता अर्ज करता येत नाही.
किसान क्रेडिट कार्ड दवारे किती कर्ज प्राप्त होते?
किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत आपणास किती कर्ज प्राप्त होऊ शकते हे आपल्या उत्पन्न अणि जमीनीवर अवलंबून असते.साधारणत किसान क्रेडिट कार्ड दवारे शेतकरयांना तीन लाखांपर्यंतचे कर्ज दिले जाते.
यात 01 लाख ६० हजार पर्यंत कर्ज घेतल्यावर आपणास कुठलेही तारण ठेवण्याची आवश्यकता नसते पण तीन लाखापर्यंतचे कर्ज घेतल्यावर काहीतरी वस्तु तारण ठेवावी लागते यावर दिल्या जात असलेल्या कर्जावर 7 टक्के इतके व्याज आकारले जाते.