How to Solve Insurance Problems

How to Solve Insurance Problems : इन्शुरन्स कंपनीच्या जाळ्यात अडकलेला असाल तर अशा प्रकारे करा तक्रार !

How to Solve Insurance Problems : आपले भविष्य सुरक्षित व्हावे याकरिता अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे इन्शुरन्स काढत असतात परंतु अनेकदा इन्शुरन्स कंपन्यांकडून बेईमानी आपल्याला सहन करावी लागते. त्यांची अरेरावी सहन करावी लागते, अशावेळी पॉलिसीधारक अक्षरशः वैतागून जातात.

कधी कधी आपण जी पॉलिसी काढतो त्यासाठी क्लेम करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. जर तुमच्या बाबतीत देखील असे काही घडत असेल तर आता चिंता करू नका.

आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला इन्शुरन्स कंपनीच्या बेईमाने व्यवहाराला आळा बसवण्यासाठी काही महत्त्वाची असलेली माहिती सांगणार आहोत, त्या माहितीच्या आधारे तुम्ही इन्शुरन्स कंपनी विरुद्ध सहज तक्रार नोंदवू शकता आणि तुमची झालेली फसगत तक्रारीच्या माध्यमातून सोडवू शकता.

तक्रार केल्यानंतर विमा कंपनीने तुमची तक्रार नोंदवून घेणे आवश्यक आहे त्याचबरोबर आठ ते पंधरा दिवसांमध्ये तुमच्या तक्रारीचे समाधान झाले नाही तर तुम्ही पुढच्या स्तरावर देखील तक्रार नोंदवू शकता.

हेल्थ आणि लाईफ इन्शुरन्स पॉलिसी म्हणजेच जीवन विमा निगम यासारख्या महत्त्वाच्या पॉलिसी आपण काढत असतो, याकरिता वेगवेगळ्या इन्शुरन्स एजंट आपल्याला त्याचे महत्त्व देखील सांगत असतात.

या सर्व पॉलिसींच्या महत्त्वांना आपण म्हणून एखाद्या एजंटकडे जाऊन पॉलिसी काढतो परंतु जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा या पॉलिसीचा अनेकदा उपयोग घेता येत नाही, अशावेळी आपली फसगत झाल्याची भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते.

विमा लोकपाल यांच्या कडे करा तक्रार

विमा पॉलिसी यांच्या नाहक त्रासाला तुम्ही बळी पडलेला असेल तर अशावेळी तुम्ही तक्रार करण्यासाठी विमा लोकपाल हा एक उत्तम पर्याय वापरू शकतात. लोकपाल यांच्याकडे तक्रार करून तुम्ही तुमच्या तक्रारीचे समाधान मिळू शकतात.

अशी करा insurance issues साठी तक्रार

ग्राहक आणि सर्वप्रथम त्यांची तक्रार विमा इन्शुरन्स कंपनीकडे करणे गरजेचे आहे. ग्राहकांनी केलेल्या तक्रारीचे एक कॉपी विमा कंपनी तक्रार केंद्रात जाऊन कंपनी अधिकारी यांच्याकडे तुम्ही ही कॉपी जमा करू शकता यालाच आपण जी आर ओ असे म्हणतो. तुम्ही जवळ असणाऱ्या जीआरओ ऑफिसच्या शाखेला देखील भेट देऊ शकता किंवा ही कॉपी जीआरओला मेल करू शकता.

insurance issues साठी ऑनलाइन पद्धतीने करा अशी तक्रार

ग्राहक विमा कंपनीच्या विरुद्ध तक्रार करण्यासाठी ऑनलाईन माध्यमांच्या मदतीने देखील काही पोर्टलला भेट देऊ शकता व तिथे आपली तक्रार नोंदवू शकता. जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदवायची असेल तर त्याकरिता IGMS, IRDA त्यांच्या ऑनलाईन पोर्टलवर तुम्ही तक्रार नोंदवू शकता.

तक्रार केल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत विमा कंपनीने तुमची तक्रार सोडवणे गरजेचे आहे. तक्रार सोडवल्यानंतर देखील तुम्ही समाधानी नसेल तर अशावेळी तुम्ही पुढच्या स्तरावर विमा कंपनी विरोधात तक्रार करू शकतात.

तुम्ही तुमच्या तक्रारीची कॉपी विमा नियामक IRDA अधिकारी यांच्याकडे संपर्क साधू शकतात. IRDA अधिकारी यांनी दिलेल्या निर्णय यावर देखील तुम्ही सहमत नसाल तर पुढे विमा लोकपाल यांच्याकडे तक्रार करू शकता अशा प्रकारे विमा धारक पॉलिसी कंपनी विरुद्ध तक्रार नोंदवू शकता आणि आपल्या समस्येचे निराकरण करू शकतात.

देशात आहे 17 लोकपाल केंद्रे

सध्या देशात एकंदरीत सतरा लोकपाल केंद्र आहेत. या लोकपाल केंद्राच्या मदतीने विमाधारक विमा कंपनीच्या विरोधात आपली तक्रार नोंदवू शकतात आणि तक्रारीचे समाधान आठ ते पंधरा दिवसाच्या आत करू शकतात.

लोकपाल यांच्याकडे केल्यानंतर विमा कंपनी यांना पॉलिसीधारकांची तक्रार लवकरात लवकर सोडवावी लागेल अन्यथा विमा कंपनी यांच्या विरोधात कोर्टामध्ये नोटीस काढण्याची किंवा पुढचे पाऊल उचलण्याची जी काही शक्यता आहे त्याचे सर्व अधिकार लोकपाल यांना देण्यात आलेले आहेत.

लोकपाल केंद्राकडे अशी करा तक्रार

जवळपासच्या लोकपाल केंद्र शाखेकडे तुम्हाला तक्रार करायची आहे. तक्रार करण्याकरता तुम्ही ऑनलाईन पद्धतीचा देखील उपयोग करू शकता. ऑनलाइन तक्रार तुम्ही करत असाल तर त्यानंतर तुम्हाला त्याची हार्ड कॉपी देखील लोकपाल केंद्राकडे सबमिट करावे लागेल. या कॉपी मध्ये तुम्हाला तुमची महत्त्वाची माहिती म्हणजेच पॉलिसी नंबर तक्रार करणाऱ्या कंपनीची माहिती.

जर तुम्ही लोकपाल केंद्रामध्ये जाणार असाल तर अशावेळी तुम्हाला फॉर्म P II आणि फॉर्म P III भरून तक्रार नोंदवावी लागेल, अशाप्रकारे तुम्ही विमा कंपनी द्वारे झालेली तुमची फसगत सहजच दूर करू शकता व तुमच्या तक्रारीच्या माध्यमातून तक्रारीचे निरसन करू शकता.

शक्यतो पुढच्या वेळी जर तुम्ही एखादी पॉलिसी विकत घेणार असाल तर त्यांच्या सर्व टर्म्स अँड कंडिशन वाचूनच नंतरच पॉलिसी विकत घ्या नाहीतर भविष्यात व जगत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *