PF Withdrawal
|

PF Withdrawal : पीएफ च्या मदतीने आता घर खरेदी, गृह कर्ज फेडू शकता आरामात, जाणून घ्या आताच नियमावली !

PF Withdrawal : अनेकदा घर खरेदी करणे म्हणजे सोपे नसते. घर खरेदी केल्यावर त्या घराचे पैसे वेळेवर फेडणे देखील महत्त्वाचे ठरते घर खरेदी करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते.

त्यासाठी प्रत्येक जण आर्थिक बजेट देखील प्लॅन करत असतो परंतु तुम्ही घर घेतलेले आहे आणि त्यानंतर जर तुम्हाला पैसे फेडता येत नसेल परंतु तुमचे स्वतःचे पी एफ खाते असेल तर या खात्याचा उपयोग तुम्ही तुमच्या गृह कर्जासाठी वापरू शकता.

घरासाठी घेतलेले लोन फेडण्यासाठी तुम्ही या खात्याचा हमखास उपयोग करू शकता. याबद्दलची माहिती अनेकांना नसते जर तुम्हाला देखील ही माहिती नसेल तर आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुमच्यासाठी ही माहिती घेऊन आलेलो आहोत.

आता भविष्यात तुमच्या बाबतीत देखील असे काही घडत असेल तर चिंता करू नका. तुम्ही तुमच्या कमाईच्या माध्यमातून शासन दरबारी जे पीएफ खाते उघडलेले होते त्याच्यामध्ये जमा झालेला पैसा आता तुम्हाला घर खरेदी करताना व घराचे हप्ते फेडताना मदत करेल.

जर भविष्यात तुम्ही घर खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी ठरू शकते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ईपीएफ मधून तुम्ही तुमच्या भविष्यातील घर खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतात तसेच घराचे हप्ते देखील वेळेवर फेडू शकता.

असे केल्याने तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा बोजा राहणार नाही. एपीएफच्या माध्यमातून घर खरेदी करण्यासाठी लागणारा पैसा वापरण्यासाठी नेमके काय नियम असतात हे आज आपण जाणून घेणार आहोत.

पी एफ पैसे काढण्याचे नियम

ईपीएफ योजनेच्या कलम 68 बीबीनुसार तुम्ही तुमच्या घरासाठी घेतलेल्या कर्जाची रक्कम परत मिळण्यासाठी ईपीएफ मधून पैसा वापरू शकता त्यासाठी तुमच्या घराची नोंदणी ही तुमच्या व्यक्तिगत किंवा संयुक्त नावाने करावी तसेच अर्जदाराने गेले दहा वर्ष तरी पीएफ खात्यामध्ये पैसे भरलेले असावे. पाच वर्ष सेवा पूर्ण केल्यानंतर काढलेल्या पीएस च्या रकमेवर कोणताही कर तुम्हाला भरावा लागत नाही.

हफ्ता फेडण्यास करेल मदत

घर खरेदी केल्यानंतर घराचा हप्ता परत फेडण्यास करतात तुम्हाला काही गोष्टींची काळजी देखील घेणे गरजेचे आहे. तुम्ही तुमच्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यावर असाल तर तुम्ही पीएफचे पैसे काढू शकता परंतु पुन्हा पीएफ मध्ये पैसे जमा करण्याकरिता तुम्हाला भरपूर वेळ लागेल तसेच गृह कर्जासाठी लागणारा व्याजपेक्षा जास्त असतो आणि म्हणूनच गृह कर्जाची परत फेडण्या करण्यासाठी आपल्याला ईपीफ कॉर्पस ची मदत घ्यावी लागते.

घर खरे करताना जर तुमच्याकडे पैसे जमा नसतील तर अशावेळी शेवटचा पर्याय म्हणून देखील तुम्ही पी एफ खात्याकडे वळू शकता आणि म्हणूनच या तात्पुरत्या पैशांच्या मदतीने तुम्ही तुमच्या घरावरचे संकट दूर करू शकता.

जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही पीएफ मधून जे पैसे काढलेले आहेत त्याची भरपाई करू शकत नसाल तर अशावेळी ईएमआय कमी करण्याकरिता तुमचा कालावधी तुम्ही वाढवू शकता. अनेक जण पीएफ मधील पैसा हा रिटायरमेंटसाठी वापरत असतात

या पद्धतीने काढा पीएफ

जर तुम्हाला पीएफ मधून पैसे काढायचे असेल तर तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर भेट देणे गरजेचे आहे. तसेच www.epfindia.gov.in या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला आगाऊ पैसे काढण्याचा पर्याय देखील दिलेला असतो म्हणजेच तिथे एक ऍडव्हान्स क्लेम नावाचा पर्याय आहे जेथे तुम्हाला क्लिक करायचे आहे.
या वेबसाईटचे पेजवर तुम्हाला लॉगिन करायचं आहे.

  1. यानंतर युएएन आणि पासवर्ड नंबर वापरून तुम्हाला पोर्टलवर साइन इन करायचे आहे.
  2. त्यानंतर ऑनलाईन सर्विस बटनावर क्लिक करून तुम्हाला ईपीएफ मधून आगाऊ पैसे काढण्यासाठीचा जो आवश्यक फॉर्म आहे तो भरायचा आहे.
  3. त्यानंतर क्लेम फॉर्म निवडून बँक खात्याचे शेवटचे चार अंक तुम्हाला टाकायचे आहेत आणि तुम्हाला फॉर्म ऑथराईज करून घ्यायचा आहे.
  4. सर्व गोष्टी पडताळणी केल्यानंतर प्रोसेस फॉर ऑनलाईन या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे जाता येणार आहे.
  5. आता पीएफ फॉर्म ऍडव्हान्स निवडा येथे तुम्हाला आवश्यक असणारी रक्कम टाकायची आहे आणि पुढे प्रोसिड करायचे आहे
  6. यानंतर चेकची स्कॅन केलेले परत तुम्हाला अपलोड करायचे आहे.
  7. यानंतर आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर ओटीपी वर क्लिक करायचे आहे. तुम्हाला एक नंबर येईल तो तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर तुमच्या दावा तिथे दाखल केला जाईल पीएफ पैसे देखील तुमच्या अकाउंट मध्ये काही दिवसांमध्ये येतील.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *