इमरजेंसी फंड म्हणजे काय आणि हा फंड अडचणीच्या काळात आपल्याला कशी मदत करतो;पहा सविस्तर | Emergency Fund
Emergency Fund : हल्ली अडचण नाही असा क्वचितच व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतो. दिवसेंदिवस मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी व त्या गरजा पूर्ण करताना पैशाची उलाढाल मोठ्या प्रमाणावर करावी लागते. कधी कधी महिन्याचे आर्थिक बजेट देखील कोलमडून जाते.
परंतु जर तुमच्याकडे Emergency Fund असेल तर या इमर्जन्सी फोनच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या अडचणी दूर करू शकता. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला इमर्जन्सी फंड बद्दल महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत. जर अडचणीच्या काळामध्ये तुम्ही इमर्जन्सी फोनचा योग्य पद्धतीने उपयोग केला तर तुमच्या अनेक अडचणी सोप्या होण्यासाठी मदत होणार आहे.
एखाद्या आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी आपण जो पैसा जमा केलेला असतो त्याला इमर्जन्सी फंड असे म्हणतात. या फंडच्या मदतीने तुम्ही तुमच्या अनेक आर्थिक गोष्टी सहजच सोडवू शकता.
इमर्जन्सी फंड असल्याने तुम्हाला गुंतवणूक केलेल्या पैशाला हात लावण्याची वेळ येत नाही तसेच कुणासमोर हात पसरवण्याची वेळ देखील येत नाही, तसेच घरामध्ये कोणत्याही प्रकारची आर्थिक संकट भासत नाही, म्हणूनच मानवी जीवनामध्ये इमर्जन्सी फंड अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
स्वतः ची गरज तपासा
स्वतःची गरज आणि बाजाराची परिस्थिती या सर्वांच्या आधारावर मार्केट तज्ञांची मदत घेऊनच इमर्जन्सी फंड तयार करायला हवा, असे केल्याने तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळते व आपला पैसा देखील सुरक्षित राहतो.
जीवनामध्ये खूप साऱ्या अडचणी जेव्हा येतात तेव्हा आपले वाले हात वर करून देतात, अशावेळी तुम्ही जमा केलेला पैसा तुमच्या पाठीशी उभा राहतो. पैशाच्या मदतीने तुम्ही अनेक अडचणी दूर करू शकता आणि म्हणूनच पैसा हा मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. पैसा तुम्हाला वर आणतो आणि तुमच्या जीवनाला एक दिशा देखील दाखवतो.
पैशाच्या मदतीने तुम्ही तुमचे जीवन अगदी आनंदाने व्यक्त करू शकता म्हणून सध्याच्या जीवनामध्ये पैसाच सर्व काही आहे पैसा तुमच्याकडे असला तर सर्व लोक तुमच्या आजूबाजूला फिरतात. जर तुमच्याकडे पैसा नसेल तर कोणीही तुम्हाला विचारणार नाही हे देखील तितकेच खरे आहे म्हणूनच अशावेळी पैसा जरी जवळ असला तरी त्याची योग्य गुंतवणूक करणे गरजेचे आहे.
सुरक्षित ठिकाणी ठेवा
इमर्जन्सी फंड मध्ये जो पैसा असतो, तो संकट समयी वापरण्याकरिता जमा केलेला असतो. या पैशाच्यामुळे जर तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचे मार्ग नसतील तर अशावेळी तुम्ही या इमर्जन्सी फंडला हात लावू शकता. तज्ञ मंडळीच्या मते इमर्जन्सी फंडची रक्कम ही कमीत कमी तुमचे सहा महिन्याच्या कमाई एवढी असायला हवी.
जर तुम्ही महिन्याला 50 हजार रुपये कमवत असाल तर तुमच्याकडे तीन लाख रुपये चेवइमर्जन्सी फंड असणे गरजेचे आहे, त्याचबरोबर तुम्हाला हा पैसा अशा ठिकाणी गुंतवणूक करायचे आहे. जिथे तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळतील तसेच हा पैसा कुठेही ब्लॉक होणार नाही याची काळजी देखील तुम्हाला घ्यायला पाहिजे. जेणेकरून तुम्हाला या इमर्जन्सी फंडचा त्वरितच गरजेच्या वेळी उपयोग करता येऊ शकतो.
अशाप्रकारे करा तयार Emergency Fund.
तुमच्या एकंदरीत गरजा काय आहेत तसेच बाजाराची सध्या स्थिती काय आहे? या गोष्टींचा विचार करूनच तज्ञांच्या मते इमर्जन्सी फंड मध्ये पैसा गुंतवणूक करायला हवा तसेच तुमचा पैसा हा सुरक्षित राहील अशा ठिकाणी ठेवा याकरिता तुम्ही ज्या वेगवेगळ्या सरकारी योजना आहेत त्या योजनांचा लाभ घेऊ शकता.
या सर्व स्थितीमुळे तुमचा पैसा ठेवण्याची शक्यता कमी असते. जर प्रायव्हेट ठिकाणी तुम्ही पैसा गुंतवणूक केला तर फसगत होण्याची शक्यता जास्त असते.
बँक मध्ये एफडी आणि आरडी तज्ञ मंडळींच्या मते इमर्जन्सी फंडला बँक मध्ये एफडी करून सुरक्षित ठेवायला हवे. काही बँक एक वर्ष किंवा त्याच्यापेक्षाही कमी कालावधीसाठी एफडी बनवून देतात अशावेळी तुम्ही वेगवेगळ्या बँकांमध्ये एफडी बनवून व्याज कमवू शकतात.
इमर्जन्सी फंड चे काही पैसे तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा बँक मध्ये आरडी स्वरूपामध्ये देखील जमा करू शकतात. पोस्ट ऑफिस मध्ये जमा केलेला पैसा हा प्रामुख्याने 5.8% वर्षभरात आपल्याला व्याज देते तर बँकेमध्ये 4 ते 6 टक्के व्याज आपल्याला मिळते.
बॉण्ड पासून वाचा
कोणत्याही प्रकारच्या इमर्जन्सी फंडला स्टॉप किंवा बॉण्ड पासून लांबच ठेवा शक्यतो इमर्जन्सी फंड अधिक तर मंदीच्या दरम्यान वापरला जातो परंतु जर तुम्ही स्टॉक आणि बॉण्ड यांच्यामध्ये अडकत असाल तर तुम्हाला तुमचा इमर्जन्सी मध्ये असलेला पैसा बाहेर काढता येणार नाही कारण की बॉण्ड हे विशिष्ट वर्षासाठी असतात, अशावेळी तुम्ही गुंतवलेला पैसा तुम्हाला लवकर बाहेर काढता येणार नाही.